पेन्शन धारकांना मिळेल कर्ज : तर एसबीआयची ‘ही’ योजना करेल तुम्हाला मदत!

पेन्शन धारकांना मिळेल कर्ज :

पेन्शन धारकांना मिळेल कर्ज : माणसाला कुठल्याही वयामध्ये पैशांची गरज भासू शकते. बऱ्याचदा आपल्यावर असा प्रसंग आलेला असतो आणि त्यावेळी आपल्याला पैशाची खूप गरज असते .आणि त्यावेळी आपल्याकडे पैसे नसतात .

बऱ्याचदा व्यक्तीवर अनेक विपरीत असे प्रसंग येतात. काही वेळा आपल्याकडे असलेला पैसा देखील कमी पडतो . आपल्याला जास्तीच्या पैशासाठी कर्ज व इतर पर्यायांचा आधार घ्यावा लागतो.

त्यामुळे बरेच जण बँकांचा आधार घेतात.

काही वेळा बँकेतून कर्ज किंवा लोन घेऊन सुद्धा आपली गरज पूर्ण करतात .

बँक देखील कर्ज देतात पण जो व्यक्ती त्यांच्या पात्रता पूर्ण करतो . त्यांचा कर्ज देतात .

तसेच आपल्या समाजात अनेक अशा व्यक्ती आहेत त्या सेवा निवृत्त झालेले आहेत . त्यांना सरकारकडून दर महिन्याला ठराविक अशी रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते .

पेन्शन धारकांना मिळेल कर्ज :

तरी देखील असा व्यक्तींना काही वेळा जास्तीच्या पैशांची गरज पडू शकते .किंवा एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये जास्तीचा पैसा लागतो.

त्यामुळे वयाच्या या टप्प्यावर कर्ज मिळणे खूप गरजेचे असते . आणि ते मिळणे हि खूप अवघड असते . .

अशा व्यक्तींसाठी एक महत्त्वाची बातमी असून जर निवृत्तीवेतनधारक व्यक्तींचे खाते जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर,

एसबीआयची पेन्शनधारकांसाठी असलेली हि विशेष कर्ज योजना अशा निवृत्तीवेतनधारक व्यक्तींसाठी फायद्याची असते .

याच योजनेविषयीची माहिती लेखात घेऊ.

 स्टेट बँक ऑफ इंडियाची पेन्शन लोन स्कीम

याबाबत सविस्तर वृत्त असे की, निवृत्त झालेले व्यक्ती पेन्शन घेत असत

व त्यांचे खाते जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर पैशांची गरज पडली तर,

अशा व्यक्तींसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून पेन्शन लोन स्कीम राबवली जाते आहे.

या योजनेच्या माध्यमातून अशा पेन्शन धारकव्यक्तींना बँकेकडून कर्ज मिळू शकते.

पेन्शन धारकांचे खाते जर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल तर ते पेन्शन धारक याचा लाभ घेऊ शकतात .

लोनचे सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी लागणारे जे काही प्रोसेसिंग म्हणजेच प्रक्रिया शुल्क असते ते खूपच कमी लागते

त्यामुळे प्रोसेसिंग सोपी वाटते .

. तसेच हि प्रक्रिया खूप कमी वेळात होते .

तसेच यावर आकारले जाणारे व्याजाचे दर हे पर्सनल लोन साठी असलेले व्याजदरांपेक्षा कमी असतात त्यामुळे हि लोन प्रक्रिया परवडण्या सारखी ..

पेन्शन धारकांना या कर्जाची परतफेड करण्यासाठी ईएमआयचा पर्याय मिळतो .

महत्वाचे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुठल्याही शाखेमध्ये तुम्ही पेन्शन कर्जाकरिता अर्ज करू शकतात हे एक खुप महत्वाची गोष्ट .

 पेन्शन लोनसाठी असलेल्या अटी

  • पेन्शनधारकांना जे काही पेन्शन लोन मिळते ते साधारणपणे पर्सनल लोन म्हणजेच वयक्तिक कर्जासारखेच असते.

घेण्याकरिता कर्जदाराची पेन्शन पेमेंट ऑर्डर स्टेट बँक ऑफ इंडिया कडेच असणे गरजेचे असते.

  •  यामध्ये पेन्शन धारकाला लेखी द्यावे लागते की जो काही कर्जाचा कालावधी आहे
  • त्या कालावधीमध्ये पेन्शनधारक कोषागाराला दिलेल्या आदेशात कुठल्याही प्रकारची सुधारणा करणार नाही.
  • तसेच बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळेपर्यंत कोषागाराला ते लेखी स्वरूपामध्ये द्यावे लागणार आहे.
  • तसेच पेन्शनधारकाने पेन्शनची रक्कम इतर कुठल्याही बँकेत हस्तांतरित करण्याची विनंती कोषागार स्वीकारणार नाही.
  • जोडीदार( कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र) किंवा योग्य तृतीय पक्षाच्या हमीसह योजनेच्या इतर सर्व अटी आणि शर्ती लागू राहतील.
  •  पेन्शन कर्जाचा परतफेड करण्याचा कालावधी हा 72 महिन्याचा आहे व या कर्जाची परतफेड वयाच्या 78 व्या वर्षापर्यंत करावी लागते.

 पेन्शन लोन संबंधिची अधिकची माहिती कुठे मिळेल?

  • 1800-11-2211 या टोल फ्री क्रमांक डायल करून तुम्ही याविषयीची माहिती मिळवू शकतात. 

Leave a Comment

error: Content is protected !!