२० हजारांच्या बजेटमध्ये मिळाला आणखी एक दमदार फोन; वाय सीरिजमध्ये Vivo Y36 5G चा समावेश झाला

Vivo Y36 5G इंडोनेशियामध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन लवकरच भारतीयांच्या भेटीला सुद्धा येऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी फोनचा इंडियन रिटेल बॉक्स सुद्धा समोर आलेला आहे.
विवोनं आपल्या ५जी पोर्टफोलियोचा विस्तार करत Vivo Y36 5G लाँच केलेला आहे.

सध्या हा नवीन मोबाइल जागतिक बाजारात सुद्धा आला आहे,

परंतु लवकरच भारतीय बाजारात देखील ह्याचं आगमन होऊ शकणार आहे.

कारण काही दिवसांपूर्वी ह्या डिवाइसचा इंडियन रिटेल बॉक्स देखील पुढे आलेला होता.

चला माहिती करून घेऊया ग्लोबल किंमत आणि स्पेसिफिकेशन पहा.

Gold-Silver Price on 23 September 2023: सोन्याचा भाव कमजोर, चांदी चमकत आहे, आज तुमच्या शहरात दर काय आहे?

Vivo Y36 5G ची किंमत
 

Y36 5G चा एकमेव स्टोरेज व्हेरिएंट इंडोनेशियामध्ये सुद्धा लाँच करण्यात आलेला आहे.

ज्यात ८जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेज देण्यात आलेले आहे. ह्या स्मार्टस्फोनची किंमत ३,७९९,००० इंडोनेशियन रुपया आहे

म्हणजे सुमारे २०,००० रुपये इतके आहे. हा डिवाइस क्रिस्टल ग्रीन आणि मिस्टिक ब्लॅक अशा दोन रंगात विकत घेता येणार आहे.
Vivo Y36 5G चे स्पेसिफिकेशन्स
फोनमध्ये ६.६४ इंचाचा एचडी प्लस अल्ट्रा-ओ डिस्प्ले देण्यात आलेला आहे. कंपनीनं ह्यात पंच होल स्क्रीनचा वापर केलेला आहे.

हा मोबाइल अँड्रॉइड १३ आधारित फनटच ओएस १३ वर चालत आहे.

प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक डायमेन्सिटी ६०२० चिपसेटचा वापर करण्यात आला आहे.

हा प्रोसेसर २.२ गिगाहर्टझ क्लॉक स्पीडवर सुद्धा चालतो.

डिवाइसमध्ये ८ जीबी रॅमसह २५६ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

त्याचबरोबर ८जीबी एक्सटेंडेड रॅमचा सपोर्ट देखील आहे. ज्याच्या मदतीनं १६ जीबी पर्यंतची पावर सुद्धा मिळवता येते.

हा फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसोबत बाजारात आलेला आहे.

ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलची बोकेह लेन्स मिळतो.

तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सुद्धा आहे.

Vivo Y36 5G मध्ये ५०००एमएएचची बॅटरी आणि ४४वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे.

डिवाइसमध्ये ड्युअल सिम ५जी, ब्लूटूथ, वाय-फाय आणि बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन मिळतात.

तर सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
Vivo Y36 5G इंडिया लाँच
काही दिवसांपूर्वी विवो वाय ३६ ५जीचा इंडियन रिटेल बॉक्स समोर आला होता.

त्यामुळे हा फोन लवकरच भारतात सुद्धा लाँच केला जाणार आहे असा अंदाज लावला जात आहे.

इंडोनेशियामध्ये जरी ह्याची किंमत २० हजारांच्या आसपास असली तरी भारतात ही किंमत १५ हजार रुपयांच्या असपास असू शकणार आहे.

आता आपल्याला कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार आहे.

क्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट करुन Tata Nexon फेसलिफ्ट घरी आणू शकणार आहात; पाहा दर महिन्याला हप्ता किती भरावा लागणार आहे? फायनान्स डिटेल्स घ्या जाणून

Leave a Comment

error: Content is protected !!