वसतिगृह निर्वाह भत्ता माहिती! नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत .
की राज्य सरकार ने आता पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता हा 20 हजार ऐवजी 60 हजार देण्याचा निर्णय घेतला आहे.
Dr. Panjabrao Deshmuk scholarship Increase in Amount.
वसतिगृह निर्वाह भत्ता माहिती!
मा. मुख्यमंत्री महोदयांनी दि.०३.०५.२०२३ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार,
शासनाचे विविध विभाग / उपक्रम / महामंडळे यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचे निकष एकसारखे असावेत,
यासाठी शिफारस करण्याकरिता मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती.
उपरोक्त समितीने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने दि.१९.१०.२०२३ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णयानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने,
दि.३०.१०.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये विविध विभागात देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती,
अधिछात्रवृत्ती व वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता, स्वाधार, स्वयंम अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये तसेच,
यापुढे प्रस्तावित करण्यात येणाऱ्या योजनांमध्ये एकसमानता रहावी, यासाठीचे धोरण निश्चित केले आहे.
Dr. Panjabrao Deshmuk scholarship Increase in Amount.या धोरणात वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी किती रक्कम अदा करावी,
याबाबतचे दर निश्चित करण्यात आले आहेत.
तसेच, हे दर उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येत असलेल्या विद्यार्थ्यांना लागू करण्यास देखील उपरोक्त धोरणात मान्यता दिली आहे.
त्यानुसार या विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत पात्र लाभार्थी,
विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मान्यता दिलेल्या निर्वाह भत्त्याचे दरलागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता रकमेत वाढ.
राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे व कला संचालनालय,
मुंबई यांच्या अखत्यारितील शासकीय, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये,
अंशतः अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतने / सार्वजनिक विद्यापीठे (अभिमत विद्यापीठे / स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे
वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांस शासनाच्या सक्षम,
प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (Centralized Admission Process-CAP) (व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरावरील प्रवेश वगळून) प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी,
ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.८.०० लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे,
अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व निर्वाह खर्च भागविण्यासाठी
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून खालील सुधारीत दराने निर्वाह भत्ता,
पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट वितरीत करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.