UPI New Rules 2023 :15 ऑगस्ट पासून देशातील सर्व पंचायतींमध्ये UPI होणार अनिवार्य

UPI New Rules 2023

UPI New Rules 2023 : तुम्हाला माहिती असेल, सध्या संपूर्ण जग डिजिटलायझेशनकडे वळत आहे. अशातच आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

देशातील सर्व पंचायतींमध्ये आता यूपीआय सेवा अनिवार्य होणार आहे. 15 ऑगस्ट पासून हा नियम लागू होणार आहे. याबाबत पंचायती राज मंत्रालयाने एक पत्रक जारी केले आहे.

UPI New Rules 2023 : पहा काय म्हटले केंद्र सरकारने

देशातील सुमारे 98 टक्के पंचायती आधीपासूनच यूपीआय-आधारित व्यवहार करत आहेत. आतापर्यंत सार्वजनिक वित्तीय प्रबंधन प्रणालीच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे.

मात्र आता सर्व पंचायतींमध्ये पैसे भरण्यासाठी डिजिटल प्रक्रिया वापरण्यात येईल. यासंदर्भात पंचायती सर्व यूपीआय सर्व्हिस प्रोव्हाईडर कंपन्यांसोबत आज एक बैठक घेणार आहे.

यामध्ये गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीम, मोबिक्विक, व्हॉट्सअप पे, अमेझॉन पे आणि भारत पे अशा सर्व यूपीआय प्लॅटफॉर्मच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

इतर बातम्या

तलाठी भरती ऑनलाईन अर्ज सुरु -येते करा अर्ज

ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार मोठे बदल

सरकारच्या नव्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपये.. फक्त एक अर्ज !!

Leave a Comment

error: Content is protected !!