two wheeler headlight rule : १ एप्रिल २०१७ पासून देशातील मोटरसायकल मध्ये ऑटोमॅटिक हेडलाईट ऑन फीचर देण्यात आले आहे. या वैशिष्ट्यामुळे सर्व वाहनांचे हेडलाईट नेहमी चालू ठेवण्यात आले
हेडलाइट्स बंद किंवा चालू करण्यासाठी कोणतेही स्विच नसणार हा नियम केंद्रीय परिवहन मंत्रालयाने १ एप्रिल २०१७ पासून लागू केला आहे. मात्र यामागे नेमके काय कारण आहे ते आपण या मॅसेजमध्ये सविस्तर जाणून घेऊ.
two wheeler headlight rule : पहा काय कारण आहे ?
केंद्र सरकारने असा नियम का काढला ? रस्त्या अपघातात दुचाकी वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ऑटोमॅटिक हेडलाईट ऑन वैशिष्ट सुरू करण्याची शिफारस केली होती.
नेहमी चालू असलेल्या हेडलाईटचा मुख्य उद्देश रस्त्यांवरील दुचाकींची दृश्य मानता वाढवणे हा होता, वास्तविक अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये वाहनांची दृश्यमानता वाढवण्यासाठी हा नियम अनेक वर्षापासून लागू आहे
वाहन दिसत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्ता अपघात होतात पण गाड्यांचे हेडलाईट सुरू ठेवल्याने अपघाताचे प्रमाण कमी झाले असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.