ठिबक सिंचन योजनेतून मिळणार अनुदान धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल घेत, याबाबत केंद्र सरकारकडे विभागामार्फत पाठपुरावा केला.ठिबक सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
एका शेतकऱ्याचे निवेदन! कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची तत्परता अन् संपूर्ण देशात लागू झाली योजना!
मुंबई : अकोला येथील शिवार फेरीच्या दौऱ्यात एका शेतकऱ्याने कृषिमंत्री धनंजय मुंडेंना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी अनुदान देण्याबाबत निवेदन दिले होते.
शेतकऱ्याची मागणी वर विचार करत याबाबत धनंजय मुंडेंनी कृषी विभागामार्फत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.
धनंजय मुंडे यांच्या निवेदना नंतर आता त्यानुसार आता संपूर्ण देशात प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेतून फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीसाठी हेक्टरी तब्बल 40 हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित झाले आहे.
या अनुदानाचा लाभ जवळपास सर्वच शेतकऱ्यांना घेता येईल.
ठिबक सिंचन योजनेतून मिळणार अनुदान
कृषिमंत्री धनंजय मुंडे हे गेल्या महिन्यात डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे शिवार फेरी कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते. त्यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सचिन अग्रवाल यांनी धनंजय मुंडे यांना निवेदन दिले होते.
संत्रा फळ पिकाची गळती झाली असून, फळ बागांना स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली बसवण्यासाठी अनुदान देण्यात यावे, अशी विनंती अग्रवाल यांनी निवेदनाद्वारे केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारच्या कृषी योजनांचा आढावा घेत असताना प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेत काही सुधारणा सुचवल्या होत्या. धनंजय मुंडे यांनी देखील शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल घेत, याबाबत केंद्र सरकारकडे विभागामार्फत पाठपुरावा केला.
केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये राज्य सरकारने सुचवलेली सुधारणा स्वीकारत ऑटोमेशन अर्थात स्वयंचलित ठिबक प्रणाली विकसित करण्यासाठी प्रति हेक्टरी 40 हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले आहे.