ST Bus: त्यामुळे कळंबच्या आगारातील सर्व मार्गावरील बस वाहतूक सुरळीत चालू राहण्याची शक्यता दिसून येत आहे.कळंब – ऐन
दिवाळी सणाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा एसटी कष्टकरी जनसंघाचे नेते गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली सोमवार (ता.
६) पासून आझाद मैदानात पुन्हा एकदा आंदोलन चालू होत आहे. त्यामुळे आंदोलनास येथील एसटीच्या कळंब आगारातील
जवळपास १०० टक्के कर्मचाऱ्यांचा पाठिंबा नाही अशी माहिती मिळत आहे आणि अद्यापही एक ही कर्मचारी यांची संपावर
जाणार आहेत असे लेखी कळविलेले नाही.त्यामुळे कळंबच्या आगारातील सर्व मार्गावरील बस वाहतूक सुरळीत चालू राहण्याची
शक्यता दिसून येत आहे.दरम्यान सदावर्ते यानी मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशी भूमिका व बँकेच्या कारभारावर कर्मचारी
नाराज आहे यामुळे संप उधळून लावण्यासाठी कर्मचाऱ्यांनीच कंबर बांधलेली आहे.एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्या विविध
मागण्यासाठी गेल्यावर्षी आंदोलन करण्यात आलेले होते. त्यामुळे कष्टकरी जनसंघाचे नेते गुणरत्न सदावरते चांगलेच चर्चेत आले
होते.त्यांनी महामंडळाची बँक ही ताब्यात घेतली. त्यामुळे कळंब आगारातील खूप मोठ्या प्रमाणत कर्मचारी बाजूने होते. मात्र,
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सदावर्ते यानी आपली भूमिका विरोधात मांडल्याने कर्मचाऱ्यांत संतापाची लाट आहे.
शिवाय बँककडून कर्मचाऱ्यांची आर्थिक छळवणूक करण्यात आली आहे.
ST Bus : त्यामुळे येथील एसटीच्या कळंब आगारातील ९९
टक्के कर्मचारी नाराज झालेले आहेत. त्यामुळे सोमवारी पुकारलेल्या संपात आगारातील एकाही कर्मचाऱ्यांनी संपावर
जाणार आहे किंवा नाही याविषयी लेखी कळविलेले नाही.
त्यामुळे कळंब आगारातील सर्व मार्गावर एसटी बसेस धावणार असल्याची माहिती आगारातील चालक, वाहक यानी नाव न
छापण्याच्या अटीवर दिली आहे.कर्मचाऱ्यांत नाराजी दरम्यान कळंब आगारातील अनेक कर्मचाऱ्यांना संपावर जाणार आहात का? असे प्रश्न उपस्थित केला असता सदावर्ते यानी मराठा
समाजाला आरक्षण मिळण्याच्या मुद्यावर विरोधी भूमिका घेवून मोठी घोडचूक केली. आता आगारातील चालक वाहक किंवा
कोणीही कर्मचारी बाजूनं राहणार नसून एसटी बसची वाहतूक सुरळीत चालू राहाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.कळंबची
बस सेवा सुरू राहणारएसटी महामंडळाच्या कळंब आगारातील चालक, वाहक इत्यादी कर्मचाऱ्यांनी संपावर जाणार आहेत किंवा
नाही असे आगाराला अद्यापही लेखी कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे कर्मचारी संपावर जाण्याचा प्रश्नच उद्दभवत नाही. त्यामुळे
एसटीच्या कळंब आगारातील बसेसची सेवा सर्व मार्गावर सुरळीत चालू राहणार आहे. बालाजी भारती प्रभारी आगार प्रमुख कळंब.