शेतकऱ्यांसाठी अमेरिकेतून आली मोठी गुड न्युज ! ‘या’ कारणांमुळे यंदा पिवळं सोन भाव खाणार, सोयाबीनला ऐतिहासिक दर मिळणार

Soybean Market Price : महाराष्ट्रासोबत संपूर्ण देशभरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि

मोठी कामाची बातमी पुढे येत आहे. सोयाबीन हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश राजस्थान यांसारख्या राज्यात उत्पादित होत असणारे एक

मुख्य नगदी पीक आहे.याची लागवड आपल्या देशात खरीप हंगामामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. विशेष म्हणजे

देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी जवळपास 40% उत्पादन आपल्या महाराष्ट्रात होते. तसेच मध्य प्रदेश राज्यात एकूण

उत्पादनापैकी 45% उत्पादन घेतले जाते.म्हणजे सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात दोन नंबरवर आहे.

राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकावर अर्थकारण अवलंबून आहे.

Soybean Market Price: राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि

पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातील शेतकरी सगळीकडे या पिकावर अवलंबून आहेत.दरम्यान देशभरातील सोयाबीन

उत्पादकांसाठी अमेरिकेतून एक दिलासादायक बातमी पुढे येत आहे. ती म्हणजे यावर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची

शक्यता आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने सोयाबीन उत्पादन बाबत एक अहवाल सार्वजनिक केलेला आहे.या अहवालानुसार,

यावर्षी भारतात सोयाबीनचे उत्पादन घटणार आहे. जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत

असल्याने सोयाबीन उत्पादनात विक्रमी घट येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यावर्षी जवळपास एक मिलीयन टन

सोयाबीन उत्पादन घटेल असा अंदाज दिसून येत आहे.यावर्षी फक्त 11 मिलीयन टन उत्पादन निघणार असा अंदाज दिसून येत

आहे. याचा परिणाम म्हणून यावर्षी सोयाबीनला चांगला दर मिळेल असे सांगितले जात आहे. खरंतर सध्या नवीन हंगामातील

सोयाबीनला अपेक्षित असा भाव सध्या मिळत नाहीये. अनेक ठिकाणी सोयाबीनला हमीभावापेक्षा सर्वात कमी दर मिळत

आहे.मात्र आगामी काही दिवसात बाजारभावात वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. भारतासह चीन, ब्राझील, अमेरिका या

देशांमध्ये देखील सोयाबीनचे उत्पादन कमी राहणार असा अंदाज आहे. एकंदरीत सोयाबीनचे जागतिक उत्पादन कमी होणार असा

अंदाज दिसून येत आहे. त्यामुळे सोयाबीनचे बाजार भाव येत्या काही दिवसात वाढतील असे सांगत आहेत.

TVS Electric Scooter :- या नवरात्रीमध्ये घरी आणा 60km रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर फक्त ₹1,650 च्या हप्त्यांमध्ये…

Leave a Comment

error: Content is protected !!