आपल्या देशात औद्योगिक क्षेत्रात वाढ होत चाललेली आहे त्यामुळे विजेच्या मागणीत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत चालली आहे.
वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोळश्याचा साठा सुद्धा अपुरा पडत चालला आहे.
त्यामुळे पारंपरिक वीज निर्मिती साधने अपुरी पडत चाललेली आहेत त्यामुळे देशाला पुढच्या येणाऱ्या काही काळात विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.
या सर्व गोष्टीचा विचार करून केंद्र सरकार ऊर्जा मंत्रालयाने रूफटॉप सौर प्रणाली योजना राबविण्याचा विचार केला आहे.
रुफटॉप सोलर योजना महाराष्ट्र: महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते त्या योजनांपैकीच एक योजना जिसे नाव Rooftop Solar Yojana आहे.
रुफटॉप सोलर योजना महाराष्ट्र
योजनेअंतर्गत घरगुती, गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना यांच्या छतावर रूफटॉप सोलर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यात येणार आहे
त्यासाठी शासनाकडून 40 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे या योजनेमुळे घरगुती वीज बिलात बचत होण्यास मदत होईल
तर सौर ऊर्जेमुळे जास्तीची ऊर्जा नेट मीटरिंगद्वारे महावितरणाला विकता येणार आहे त्यामुळे ग्राहकाला थोडीफार आर्थिक मदत मिळण्यास मदत होईल
या योजनेअंतर्गत घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान 1 किलोवॅट क्षमतेची छतावर (रूफटॉप) सौर ऊर्जानिर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून टप्पा २ अंतर्गत वित्त सहाय्य अनुदान देण्यात येणार आहे.
योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील नागरिकांना त्यांच्या घराच्या, कारखान्याच्या, कचेरीच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी 40 टक्के अनुदान देणे जेणेकरून वीज मंडळावरील वाढत चालणारा विजेचा भार कमी होईल.
वाचकांना विनंती
आम्ही रुफटॉप सोलर योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी व्यक्ती असतील जे रुफटॉप सोलर योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
योजनेचे नाव | Rooftop Solar Yojana |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार / महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवासी संस्था, निवासी कल्याणकारी संघटना, गाव, पाडा, वस्ती, दुर्गम आदिवासी जमाती |
लाभ | छतावर सोलर बसविण्यासाठी आर्थिक सहाय्य |
योजनेची सुरुवात | 2016 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
रुफटॉप सोलर योजनेचा उद्देश
- या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आलेली आहे जेणेकरून अर्जदार आपल्या मोबाइलला च्या सहाय्याने या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो त्यामुळे अर्जदारास शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
- रूफटॉप सोलर योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली एक अत्यंत महत्वाची अशी एक योजना आहे.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला स्वतःच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी 40 टक्के अनुदान देण्यात येते.
- रुफटॉप सोलर योजनेच्या सहाय्याने राज्यातील नागरिक विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनतील.
- या योजनेअंतर्गत नागरिकांच्या विजेची बचत होईल जेणेकरून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
- राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
- अनुदानाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते.
- रूफटॉप सोलर पॅनलच्या सहाय्याने मासिक घरगुती बिलात बचत करणे.
- रूफटॉप सोलर पॅनल ला लावण्यात आलेल्या नेट मीटरिंगद्वारे शिल्लक वीज महावितरण प्रति युनिट प्रमाणे ग्राहकांकडून विकत घेऊन त्यामुळे ग्राहकांना याचा थोडाफार आर्थिक लाभ मिळवून देणे.
- पारंपारिक उर्जा स्तोत्रांवरील ताण कमी करून सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा या योजनेचा उद्देश आहे.
- राज्यातील व्यक्तीचे जीवनमान सुधारणे.
- नागरिकांना अक्षय ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहित करणे
- राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
- राज्यातील नागरिकांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
- राज्यावरील विजेचा भार कमी करणे.
- प्रदूषण विरहित वीजनिर्मितीला प्रोत्साहन देणे.