शेतकऱ्यांसाठी खुशखबर…! पांढर सोने चमकल :
Cotton Price :
दिवाळीपूर्वी पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस खूप कमी दरात विकले जात होते.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कापूस बाजारातील कापसच्या मंदीचा मोठा फटका बसला आहे.शेतकऱ्याचे खूप नुकसान होत आहे.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिवाळीच्या सणासाठी तसेच रब्बी हंगामासाठी पैशांची गरज होती. आणि त्याच वेळी कापसाचाच्या भावात कमी आली.
परिणामी दिवाळीपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी गरजेपोटी बाजार भाव कमी असतानाही कापसाची विक्री केली आहे.
परंतु आता बाजारात तेजीचे संकेत मिळू लागले आहेत. आता बाजारात नवीन हंगामातील कापसाची मोठ्या प्रमाणात आवक होत असून नवीन मालाला चांगला दरही मिळू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात एक आशेचा किरण आहे.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर…! पांढर सोने चमकल
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.शेतकरी आनंदी दिसून येत आहे.गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कापूस बाजारभावात मोठी सुधारणा पाहायला मिळाली आहे.
दिवाळीपूर्वी सात हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास विकला जात होता. मात्र कापूस आता साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दरात विक्री होत आहे.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर…! पांढर सोने चमकल
यामुळे राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश मधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधान बघायला मिळत आहे.शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद बघायला मिळत आहे.
दिवाळीपूर्वी हमीभावाच्या आसपास कापसाची विक्री केली जात होती.खूप कमी किमतीत कापूस विकत असल्यामुळे यामुळे अनेक शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नव्हता.
पण आता परिस्थिती मध्ये थोडासा बदल झालेला दिसून येत आहे. बाजारभावात किंचित सुधारणा झाली आहे.
याचा परिणाम म्हणून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे.शेतकरी आनंदी आहेत.
सध्याच्या दरात किमान पिकासाठी आलेला खर्च भरून निघेल आणि पदरी चार पैसे शिल्लक राहतील अशी आशा आता शेतकऱ्यांना वाटत आहे.कापूस भावात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता कमी झाली आहे.
तसेच बाजार भावात आता सातत्याने वाढीचा ट्रेंड तयार झाला असल्याने भविष्यात आणखी तर वाढ होईल अशी आशा देखील शेतकऱ्यांना लागली आहे. आणखी कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
एकंदरीत बाजारात आलेली ही तेजी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत करीत आहे.शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान या दोन / तीन दिवसामध्ये महाराष्ट्रातील बहुतांशी बाजारात कापसाने 7300 रुपयांचा टप्पा पार केला आहे. तर राज्यातील एका बाजारात कापसाला 7500 चा दर मिळाला आहे.
कुठं मिळाला विक्रमी भाव
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, काल हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला सर्वोच्च दर मिळाला आहे.
काल या मार्केटमध्ये 3500 क्विंटल मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली.
या कापसाला काल मार्केटमध्ये किमान 7000, कमाल 7501 आणि सरासरी 7200 एवढा विक्रमी भावना मत करण्यात आला आहे.
तथापि कापसाला सरासरी 8000 चा भाव मिळाला पाहिजे अशी इच्छा शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे.