सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती? पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी मिळणार तीन हजार रुपये

सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती?

सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती?

शाळेतून मुलींची गळती कमी व्हावी, मुलींची दैनंदिन उपस्थिती १०० टक्के राहावी, मुलींची उपस्तिथी चांगली राहावी यासाठी शासनाने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

शासनाने त्यासाठी पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती सुरू केली आहे.

त्यासाठी शाळांमधूनविध्यार्थींची माहिती समाजकल्याण विभागाकडे पाठवली जाते . तेथून शिष्यवृत्ती मंजूरी झाल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा केली जाते.

सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती?

सावित्रीबाई फुले मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती हि पाचवी ते दहावीतील अनुसूचित जाती , इतर मागास पर्वग , विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील मुलींना हि शिष्यवृत्ती दिली जाते .

त्या साठी दैनिक उपस्थिती गरजेची आहे . किमान ७५ % उपस्तीथी असल्यास पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींना ६०० रुपये दिले जातात .

आठवी ते दहावीतील विद्यार्थिनींना १ हजार रुपये प्रतिवर्षाला दिले जातात .

एससीं जमातीतील मुलींना ६००, तर इतर जमातीतील मुलींना अडीच ते तीन हजार रुपये दिले जातात .

.राज्य शासनाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवर्गातील विद्यार्थिनींना ६०० ते तीन हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येते . आदिवासी सुवर्ण महोत्सवी योजनेत विध्यार्त्याना १५०० रुपये मिळतात .

त्याशिवाय इतर शिष्यवृत्तीही ३ हजार रुपयांपर्यंत देण्यात येते .

निकष काय?

शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र, मुख्याध्यापकांचा संबंधित प्रवर्गाचा दाखल, शाळेतील ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे.

कागदपत्रे काय लागतात?

राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनींना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते, आधार कार्ड, मागील वर्षाचे गुणपत्रक ही कागदपत्रे आवश्यक असतात.

ही सर्व माहिती शाळांमध्येच उपलब्ध असते. शाळांमधील शिक्षकाचीही माहिती जमा करून समाजकल्याण कार्यालयाकडे पाठवितात. त्याठिकाणी तपासणी करून पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मंजूर केली जाते.

योजनेचा लाभ घ्यावा

सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्याकांची भेट घेऊन गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे नावे किंवा शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावा . जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा.

Leave a Comment

error: Content is protected !!