सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी ! केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत .
या योजनांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासवर्गीय घटकांचा उद्धार करण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केला जातो. यासाठी विविध योजना राबविल्या जातात.
यामध्ये आयुषमान भारत कार्ड चा पण समावेश होतो .
देशातील दुर्बल घटकातील नागरिकांसाठी केंद्र शासनाने ही योजना सुरू केली आहे.
दुर्बल घटकातील नागरिकांना दवाखान्याचा खर्च परवडणारा नसतो. अनेकदा पैसे नसल्यामुळेपाहिजे तसा नागरिकांना योग्य उपचार घेता येत नाही.
यामुळे गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या अनेक लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
उपचार वेळेवर मिळत नसल्याने अनेकांना तर आपला जीव गमवावा लागतो.
यामुळे अशा दुर्बल घटकातील नागरिकांसाठी आयुष्यमान भारत योजना सुरू झाली आहे.
सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी !
ही योजना केंद्राची आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राबवली जात आहे.
मात्र आता या दोन योजना राबवण्याऐवजी या दोन्ही योजनांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.
यामुळे आता राज्यातील फक्त दुर्बल घटकातील नागरिकांनाच नाही तर राज्यातील सर्वच नागरिकांना दवाखान्याच्या खर्चासाठी पाच लाखांपर्यंतची मदत शासनाकडून मिळणार आहे.
अर्थातच पाच लाखांपर्यंतचे उपचार राज्यातील नागरिकांना मोफत मिळणार आहेत
. यासाठी आता महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राच्या आयुष्यमान भारत योजनेचे एकच कार्ड मिळणार आहे.
आता राज्यातील सर्वच रेशन कार्डधारकांना आणि महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे.
सध्या अंत्योदय आणि पिवळा रेशन कार्ड धारकांना या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आले असून नंतरच्या टप्प्यात केशरी रेशन कार्डधारक नागरिकांना देखील या योजनेत समाविष्ट केले जाणार आहे.
आता आपण आयुष्मान भारत कार्ड योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
आता आयुष्मान भारत कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. मोबाइल एप्लीकेशनचा वापर करून यासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी आयुष्यमान अॅप डाउनलोड करावे लागेल.
त्यानंतर आधार फेस आरडी हे अॅपही डाउनलोड करावे लागणार आहे.
आयुष्मान अॅपमध्ये बेनिफिशियरी लॉगिन पर्याय निवडावा लागणार आहे. मोबाइल ओटीपीद्वारे यात लॉगिन करता येईल.
सर्च पर्याय निवडून मग आधार कार्ड क्रमांक किंवा रेशन कार्ड याद्वारे पात्र लाभार्थी यादी मिळेल. त्यावर केवायसी पूर्ण करून कार्डला नोंदणी करता येते.
नोंदणी केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच हे कार्ड तयार होते.
विशेष म्हणजे याबाबतचा संदेश देखील अर्जदाराला मिळतो.
जर तुम्हाला मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून यासाठी अर्ज करता येत नसेल तर चिंता करू नका कारण की शासनाने अशा सेविका आणि ग्रामपंचायत योजनेतील रुग्णालयांमध्ये असलेल्या आरोग्य मित्रांच्या साह्याने देखील हे कार्ड सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
याशिवाय तुम्ही तुमच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र येथे देखील अर्ज करता येणार आहे.