राज्यात पुढील ४ दिवस पावसाची शक्यता; Weather Update: राज्यात पुढील ४ दिवस पावसाची शक्यता; मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात पुढील ४ दिवस पावसाची शक्यता; राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

ऐन दिवाळीमध्ये पावसाने हजेरी लावल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचा गोंधळ उडाला.

काल (गुरुवारी) मुंबई, पुणे, ठाणे, कल्याणसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.

काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या देखील घटना देखील घडल्या.

तर राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम राहिल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

आगामी ४ दिवसांमध्ये मुंबई, ठाणे आणि पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

राज्यात पुढील ४ दिवस पावसाची शक्यता;

मुंबईत हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी केला आहे.

तर येत्या २४ तासांत पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस हजेरी लावत आहे.

त्यामुळे यंदाची दिवाळी पावसातच जाणार असल्याचा अंदाज आहे. आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

. रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईमध्ये काल(गुरुवारी) रात्रीच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली.

मुंबईसह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूरमध्येही मुसळधार पाऊस झाला.

Leave a Comment

error: Content is protected !!