PM Narendra Modi WhatsApp Channel: आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्हॉट्सअॅपवर देखील फॉलो करता येऊ शकणार आहे.
पीएम मोदींचं व्हॉट्सअॅप चॅनेल लाइव्ह चालू झालं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चालू आहेत.
एक्स (ट्विटर), फेसबुक, इन्स्टाग्राम आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर त्यांना फॉलो करता येऊ शकणार आहे.
आता ह्यात व्हॉट्सअॅपचा देखील समावेश झालेला आहे.
म्हणजे तुम्ही व्हॉट्सअॅपवर PM Narendra Modi सोबत जोडले जाऊ शकनार आहेत.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्यासाठी पंतप्रधानांचा नंबर मिळवावा लागेल का?
व्हॉट्सअॅपच्या लेटेस्ट वैशिष्ट्यांच्या मदतीनं तुम्ही नंबरविना देखील पंतप्रधानांचं चॅनेल जॉइन करू शकनार आहेत.
इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मनं गेल्या आठवड्यातच WhatsApp Channel फीचर रोलआउट केलं आहे,
जो हळूहळू सर्व युजर्सपर्यंत पोहोचत आहे. ह्या प्लॅटफॉर्मच्या मदतीनं तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना फॉलो करू शकणार आहेत.
एचपी कंपनीन भारतात लाँच केला बजेट फ्रेंडली गेमिंग लॅपटॉप; 32GB RAM असलेल्या HP Omen 16 सह Victus 16 ची भारतात एंट्री झाली
कसं करायचं फॉलो?
पंतप्रधान मोदींना व्हॉट्सअॅपवर फॉलो करण्यासाठी सर्वात आधी तुमचं व्हॉट्सअॅप अपडेट करावा लागणार आहे.
जर तुमच्याकडे व्हॉट्सअॅपवर चॅनेल वैशिष्ट्य नसेल तर अॅप अपडेट कराव लागणार आहे.
त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅप ओपन करा. आता तुमच्या Status च्या जागी तुम्हाला Update चा ऑप्शन दिसणार आहे.
त्यावर क्लिक करताच तुम्हाला Channels दिसतील. तिथे Find Channels च्या ऑप्शनवर क्लिक करा आणि Narendra Modi
टाइप करा. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर पंतप्रधान मोदींच चॅनेल येणार आहे ते तुम्ही फॉलो करा, जे तुम्ही फॉलो करू शकता.
फॉलो करण्यासाठी ‘+’ बटन टॅप करा.
जर व्हॉट्सअॅप अपडेट केल्यानंतर देखील तुम्हाला हा ऑप्शन येत नसेल, तर काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
कारण हे वैशिष्ट्य गेल्याच आठवड्यात रोलआउट करण्यात आलेलं आहे,
त्यामुळे सर्व युजर्सना हे वैशिष्ट्य मिळण्यास थोडा वेळ लागू शकतो.
तुम्हाला पंतप्रधानांना मेसेज पाठवता येईल का?
नाही, चॅनेलला फॉलो केल्याने तुम्ही त्यावर मेसेज करू शकणार नाहीत.
तुम्हाला या माध्यमातून फक्त त्या चॅनेल संबंधित अपडेट्स मिळणार आहेत.
अॅडमिन जो मेसेज करेल, ते सर्व मेसेज एक ब्रॉडकास्ट प्रमाणे मिळनार आहेत.
चॅनेलवर तुमचा नंबर सुरक्षित राहतो. म्हणजे इतरांना तुमचा नंबर दिसत नाही.