पीक विम्याचा Server Down; प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या ) रब्बी हंगामातील पीक विमा भरण्याचे सर्व्हर अंतिम दिवशीच डाऊन (Server down) झाल्यामुळे,
ज्वारीचा पीक विमा (Crop Insurance) भरण्यापासून शेतकरी वंचित राहिले.
ज्वारीचा पीक विमा भरण्यासाठी शेतकरी मुदत वाढ करण्याची मागणी करत आहेत .
प्रधान फसल बीमा योजनेतील रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, भुईमूग या पिकांचा विमा 1 रूपयात भरण्यासाठी शासनाच्या वतीने जाहिरातीव्दारे माहिती प्रसिद्ध केली.
शेतकर्यांच्या या मागणीमुळे त्यामुळे ज्वारी या पिकाचा विमा भरण्यासाठी मुदत वाढ करून, अंतिम मुदत 30 नोव्हेंबर होती व इतर पिकांसाठी 15 डिसेंबर ही तारीख निश्चित केली.
मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पीक विमा भरण्याच्या सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम येऊन आधारचा सर्व्हर नाॅट वर्किंग झाल्याने,
शेतकरी विमा भरण्यासाठी सी.एस.सी केंद्रात रांगा लावून थांबले आहेत .
मात्र, शासनाकडून मुदतवाढी संदर्भात कोणतेही परिपत्रक अद्याप मिळाले नसल्या मुळे , प्रसिद्ध न झाल्यामुळे बरेच शेतकरी ज्वारीचा पीक विमा भरण्यापासून वंचित राहिले.
पीक विम्याचा Server Down;
गतवर्षी तालुक्यातील जवळपास 68 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता.
यंदा मात्र पीक विमा भरणार्य शेतकर्यांची ती संख्या अतिशय कमी आहे.
मात्र, फक्त आंधळगाव व भोसे गाव या दोनच महसूल मंडलचा पीक विमा जमा झाला.
उर्वरित सहा मंडले अद्याप पीक विम्याच्या भरपाईच्या वाटबघत आहेत.
त्यांचा विमा कधी जमा होणार हा देखील प्रश्न खूप मोठा आहे . निमित्ताने अनुत्तरीत आहे.
दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने केलेल्या रब्बी पिकाच्या नुकसानीने तालुक्यातील शेतकऱ्यांचे खूप नुकसान केले आहे .
शासनाने पंचनामाचे आदेश दिले असले, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर येथे अजून अधिकारी फिरकले नसल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे एका बाजूला निसर्गाची अवकृपा, तर दुसऱ्या बाजूला विमा कंपनीची सर्व्हर डाऊन होणे यामुळं तालुक्यातील शेतकरी भरडला जात आहे.
रब्बीत तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्र हे ज्वारी पिकाचे असून अवकाळीने तालुक्यातील शेतकऱ्यांची कंबरडे मोडले.
त्यांना आधार देण्यासाठी शासनाने ज्वारीचा पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची आवश्यकता आहे.
रब्बी हंगामात गहू, हरभरा या पिकाला 15 डिसेंबर पर्यंत मुदत दिली जाते, मग ज्वारीसाठी 30 नोव्हेंबरचीच मुदत का?
रब्बी हंगामातील सर्व पिकांना एकाच दिवशी विमा भरण्याची मुदत अंतिम देणे आवश्यक आहे.
अखेरच्या दिवसांत सर्व्हर डाऊन होण्याची ही परंपरा नेहमीची झाली.