
पांढऱ्या सोन्याचा अखंड धागा..भारतातील कापसाच्या आजवरच्या प्रवासाचा माग काढत गेल्यास आपण सिंधू संस्कृतीच्या उदयापूर्वी अनेक शतके एवढय़ा दूर जाऊन पोहोचतो.
डॉ. एम. व्ही. वेणुगोपालन
रतातील कापसाच्या आजवरच्या प्रवासाचा माग काढत गेल्यास आपण सिंधू संस्कृतीच्या उदयापूर्वी अनेक शतके एवढय़ा दूर जाऊन पोहोचतो
. आज कापसाची अनेक वाणे, त्यांच्या दरांवरून दरवर्षी उमटणारे पडसाद,
त्यावर उभारलेले अर्थकारण याचा विचार करताना कापसाचे हे विविध प्रकार भारतात नेमके कधी आले, कोणत्या देशांतून आले.
, कोणत्या राज्यांत त्यांची सर्वप्रथम लागवड झाली, हे जाणून घेणे रंजक ठरते.
२ ते ५ डिसेंबरदरम्यान मुंबईत होत असलेल्या ‘आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समिती’च्या अधिवेशनानिमित्त, पांढऱ्या सोन्याच्या इतिहासाच्या या अखंड धाग्याविषयी..
येत्या २ ते ५ डिसेंबर २०२३ दरम्यान मुंबईतील ‘जिओ वल्र्ड कन्व्हेन्शन सेंटर’मध्ये आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समिती (आयसीएसी)चे अधिवेशन होत आहे
. ‘कॉटन व्हॅल्यू चेन: लोकल इनोव्हेशन्स फॉर ग्लोबल प्रॉस्परिटी’
अर्थात ‘कापूस मूल्य साखळी: जागतिक भरभराटीसाठी स्थानिक नवोन्मेष’ ही या अधिवेशनाची संकल्पना आहे.
अधिवेशनात चर्चात्मक देवाणघेवाणीच्या माध्यमातून, उत्पादकांचे ज्ञानवर्धन करण्यासाठी आणि हे ज्ञान प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘कापसाने एकमेकांना जोडणारे अद्भुत खंड’ हे या वर्षीच्या अधिवेशनाचे शीर्षक आहे.
त्या पार्श्वभूमीवर भारतातील कापूस उत्पादन आणि वस्त्रनिर्मिती याची माहिती घेणे रंजक ठरेल.
पांढऱ्या सोन्याचा अखंड धागा..
भारताला कापूस उत्पादन आणि धाग्यांपासून वस्त्रनिर्मितीचा गौरवशाली इतिहास लाभला आहे.
सिंधू संस्कृतीच्या उदयापूर्वी अनेक शतकांपासून, काची मैदान, बलुचिस्तान येथून हा इतिहास सुरू होतो.
इसवीसनपूर्व सुमारे तीन हजार वर्षे सिंधू नदीच्या आसपास, कापसाचे मोठय़ा प्रमाणावर पीक घेतले जात असे.
कापूस पिंजणे, सूतकताई, कापड विणणे या गोष्टी मोठय़ा प्रमाणावर होत.
१८ व्या शतकाच्या मध्यापर्यंत, भारतीय उपखंडात फक्त गॉसिपियम आबरेरियम आणि गॉसिपियम हर्बेशियम या देशी कापसाची लागवड होत होती.
इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती आणि अमेरिकी क्रांतीयुद्धा (१७७५-१७८३)नंतर भक्कम आणि लांब धाग्यांच्या निर्यातीच्या मागणीमुळे भारतीय उपखंडात अमेरिकी
(जी. हिर्सुटम) कापसाच्या लागवडीसाठी वैज्ञानिक प्रयत्नांना बळ मिळाले
१७९० मध्ये, माल्टा आणि बर्बन या शहरांमधील जी. हिरसूटम रेस पंक्टेटम,
हा अमेरिकी कापूस, द्वीपकल्पीय भारतातील मद्रास आणि बॉम्बे प्रांतांमध्ये लागवडीखाली आला.
१८२९ मध्ये धारवाड, भरूच आणि खान्देश येथे कापसाचे बगिचे तयार केले गेले.
इथे, ब्राझिलियन, इजिप्शियन, अमेरिकी बर्बन, सी आयलँड आणि न्यू ऑर्लीन्स अशा परदेशी कापूस वाणांची लागवड करून चाचण्या घेण्यात आल्या.
१८४२ मध्ये, धारवाड भागातील स्थानिक ‘कुमटा’ कापसाच्या जागी न्यू ऑर्लिन्स या कापसाची मोठय़ा प्रमाणावर व्यावसायिक लागवड करण्यात आली.
१८३९ मध्ये, मध्य प्रांत आणि बेरार प्रांतात (हैदराबादशी संलग्न प्रांत ज्यात विद्यमान महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडय़ाचा भाग समाविष्ट होता.)
ब्राझिलियन वाणाच्या कापसाची लागवड सुरू झाली.
१८५३ मध्ये पंजाबात अमेरिकी कापूस वाणांच्या बियाण्यांचा उपयोग सुरू झाला.
लागवडीसाठी अनुकूल परिस्थितीच्या अभावामुळे अमेरिकी कापसाच्या उत्पादनाचे व्यावसायिक प्रयत्न थांबवण्यात आले.