Oppo Reno 8T 5G स्मार्टफोन डिस्काउंटसह १२,७६५
रुपयांमध्ये विकत घेता येईल. IDFC Bank क्रेडिट कार्डनं खरेदी केल्यास ७५० रुपयांपर्यंतचा इंस्टंट डिस्काउंट देखील मिळू
शकतो.चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी चा Reno 8T 5G कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स चेन Croma वर आता अत्यंत कमीत
किंमतीत उपलब्ध झालेला आहे. हा स्मार्टफोन देशात फेब्रुवारीमध्ये ८जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज सोबत आला
होता, ज्याची किंमत २९,९९९ रुपये ठेवण्यात आलेली होती. क्रोमावर हा आता फक्त १२,७६५ रुपयांमध्ये विकला जात
आहे.Oppo Reno 8T 5G वरील डिस्काउंटथेट डिस्काउंट तर आहेत परंतु त्याचबरोबर हा हँडसेट बँक डिस्काउंट बरोबर सुद्धा
खरेदी करता येईल. त्यासाठी ग्राहकांना IDFC Bank च्या क्रेडिट
कार्डचा वापर करावा लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला ७५० इंस्टंट सूट सुद्धा मिळू शकते. हा हँडसेट सनराइज गोल्ड आणि
मिडनाइट ब्लॅक कलर्समध्ये विकत घेता येणार आहे. कंपनीच्या ऑनलाइन स्टोर आणि Flipkart वर मात्र अशी कोणतीही ऑफर
सध्या आलेली नाही.Oppo Reno 8T 5G चे स्पेसिफिकेशन्सओप्पो रेनो ८टी ५जी मध्ये ६.७ इंचाचा फुल-
एचडी+ कर्व्ड ओएलईडी डिस्प्ले मिळतो. जो १,०८०x२,४१२ पिक्सल रिजोल्यूशन, १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट देतो आणि ३६०
हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटला सुद्धा सपोर्ट करतो. ह्या हँडसेटची जाडी फक्त ७.७ मिमी आहे तर वजन १७१ ग्राम आहे.हा स्मार्टफोन
कलर ओएस १३.० वर चालतो. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 5G चिपसेटची ताकद देखील देण्यात
आली आहे. जोडीला ८जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज सुद्धा मिळते. रॅम एक्सपान्शन वैशिष्टयाच्या मदतीनं ८जीबी अतिरिक्त
रॅम मिळून १६जीबी रॅमची सुद्धा ताकद मिळवता येते.Oppo Reno 8T 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सुद्धा देण्यात
आला आहे. ज्यात १०८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर
देण्यात आला आहे. डिवाइसमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.फोनमध्ये
४,८०० mah ची बॅटरी देण्यात आली आहे, जी ६७ वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत आहे.त्यामुळे हा फोन फक्त ४५
मिनिटांत शून्य ते १०० टक्क्यांपर्यंत चार्ज केला जाऊ शकतो, असा दावा कंपनीनं केला आहे.