oil rate: दिवाळी या काळात अन्नधान्याची मागणी वाढती असते. या वाढत्या मागणीमुळे डाळींच्या किमती वाढू लागल्या आहेत.
तशीच २५ टक्के मागणी खाद्यतेलांची सुद्धा वाढण्याचे संकेत आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे खाद्यतेलांचे दर सध्या तरी मध्यम किमतीवर थांबलेले आहेत.
भारत हा जगातील सर्वात जास्त तेल वापरकर्ता देश आहे. भारतात दरवर्षी २.२० कोटी टन खाद्यतेलाचा वापर होत आहे.
भारतात एकूण मागणीच्या ४० ते ४५ टक्केच खाद्यतेल तयार होत आहे. उर्वरित खाद्यतेल आयात केले जात आहे.
एकूण आयातीत जवळपास ६५ टक्के पामतेलाचा समावेश होत असतो.
भारतात तयार होणाऱ्या ४५ टक्के खाद्यतेलात जवळपास २५ टक्के सोयाबीन व त्यापाठोपाठ राइसब्रान (तांदळपासून) आणि भुईमुग
या तेलांचा समावेश असतो. यंदा भुईमुग पेरणीत तूट असली तरीही तांदळाचे पीक दमदार येण्याची चिन्हे दिसत आहेत.
तसेच सोयाबीनची पेरणीदेखील समाधानकारक झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता खाद्यतेल मागणी मात्र सध्या वाढलेली आहे.
याविषयी अखिल भारतीय खाद्यतेल महासंघाचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ ला सांगितले आहे की, ‘यंदा गणेशोत्सव
ते दिवाळीदरम्यान खाद्यतेल मागणी २५ टक्क्यांच्या वाढीचे संकेत दिसून येत आहेत.
Amazon Sale: फक्त प्राइम युजर्सना मिळेल ह्या तीन स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर्स
मात्र जगभर तेलबियांचा मुबलक साठा उपलब्ध आहे.
त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर
घसरलेले आहेत. परिणामी आयात स्वस्त झालेली आहे. भारताला तसेही दरवर्षी खाद्यतेलाची आयात करावी लागत आहे.
यावर्षी आयातीत तेल काही ठिकाणी देशांतर्गत तेलापेक्षा स्वस्त उपलब्ध होत आहे. त्यामुळेच दमदार आयातीमुळे मागणीत वाढ झाल्यानंतर दर थांबणार असतील.’
oil rate: तेल किंमत (₹/लिटर)
सोयाबीन तेल १४०-१५०
शेंगदाणा तेल १५५-१६०
मोहरी तेल १७०-१७५
पाम तेल १२५-१३०
सूर्यफूल तेल १४५-१५०
तेल किंमत (₹/१५ लिटर)
सोयाबीन तेल २१००-२२५०
शेंगदाणा तेल २३५०-२४५०
मोहरी तेल २६००-२७५०
पाम तेल १८७५-१९५०
सूर्यफूल तेल २२००-२३००
करोनानंतर सन २०२१-२२ दरम्यान भारतात जवळपास ११ लाख टन खाद्यतेलाची आयात झाली होती.
तो आकडा मागीलवर्षी १४ लाख टनावर गेला होता. आता यंदा तो आकडा १८ लाख टनाच्या घरांत जाण्याची शक्यतादिसून येत
आहे. त्यापैकी १५ ते १६ लाख टन खाद्यतेलाची आयात ही सर्वात जास्त मागणीचा काळ असलेल्या गणेशोत्सव ते दिवाळीदरम्यानच
होणार आहे, असे खाद्यतेल महासंघाने म्हटले आहे.
बंदरावर तेल, तेलबिया दाखल :-
‘भारतातील मोठ्या बंदरांवर मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात सुरू झालेली आहे.
एकट्या मुंबईच्या बंदरावर सध्या दीड लाख टनाहून जास्त खाद्यतेल किंवा तेलबिया दाखल झालेल्या आहेत.
त्यामुळेच दर स्थिर झाले आहेत. पावसाने दडी दिल्याने भूईमुग वगळताबाकी तेलबियांची स्थिती समाधानकारक आहे.
मात्र भुईमुगाचा बाजारावर फार परिणाम झालेला नाही’, असे खाद्यतेल महासंघाचे समिती सदस्य मितेश शैय्या यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले आहे.