
MPSC Exam Timetable 2024:एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२४ मध्ये होणार्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. एमपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार हि परीक्षा २८ एप्रिलला होणार होती, मुळात या परीक्षा १४ ते १६ डिसेंबर या कलावधीत आयोजित करण्यात आली आहे.
एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर
MPSC Exam Timetable 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) हि परीक्षा २०२४ वर्षात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केलेले असून, त्यानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २८ एप्रिलला होणार होती . राज्यसेवा मुख्य परीक्षा १४ ते १६ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आल्याची माहिती एमपीएससीने दिली आहे.
स्पर्धा पारीक्षांची तयारी विद्यार्थना योग्य रितीने करता येण्यासाठी, पेपरचा अंदाज येण्यासाठी एमपीएससीकडून प्रत्येक वर्षी संभाव्य वेळापत्र प्रसिद्ध केले जाते. त्यानुसार २०२४ मध्ये एमपीएससीतर्फे १६ परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहे. सरकारकडून संबंधित संवर्ग किंवा पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल, या गृहितकाच्या आधारे संभाव्य वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
शासनाकडून वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल परीक्षेद्वारे भरावयाच्या पदसंख्येबाबतचा तपशील अधिसूचना, जाहिरातीद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. हे वेळापत्रक अंदाजे असून त्यामध्ये बदल होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे. असा बदल झाल्यास त्याबाबतची माहिती वेबसाइटवर देण्यात येणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले. त्यामध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा अशा परीक्षा एचओएनएआर असून , संभाव्य वेळापत्रकात परीक्षेचे स्वरुप, जाहिरात प्रसिद्ध होण्याचा महिना देण्यात करण्यात आला आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी एमपीएससीच्या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ष पूर्व परीक्षा – १७ मार्च
- महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २८ एप्रिल
- महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त सेवा पूर्व परीक्षा – १६ जून
- राज्यसेवा मुख्य परीक्षा – १४ ते १६ डिसेंबर
- महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – २३ नोव्हेंबर
- अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा – ९ नोव्हेंबर