राजकीय नेत्यांना गावबंदी आणि राज्यभर साखळी आंदोलन अन् आमरण उपोषणाची मनोज जरांगेची घोषणा, असेही ते म्हणाले..

Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषदेत उपोषणाची मोठी

घोषणा केली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा जीआर घेऊन गावात या, असं मनोज जरांगे

म्हणाले.हायलाइट्स:मनोज जरांगे आमरण उपोषण करणारमनोज जरांगेंचा सरकारला इशाराराजकीय नेत्यांना

गावबंदीजालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्यांनी राज्य सरकारनं ओबीसीत समावेश करुन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी सुद्धा केली. राजकीय

नेत्यांनी जीआर घेऊनच गावात प्रवेश करावा, असं मनोज जरांगे म्हणाले. सरकारनं जर २४ तारखेच्या आत मराठा समाजाच्या

आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर २५ तारखेपासून माझ्या मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी, मराठा समाजाला

आरक्षण मिळावं म्हणून २५ तारखेपासून आमरण उपोषण पुन्हा सुरु करणार आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. त्या उपोषणात

उपचार सुद्धा घेतले जाणार नाहीत आणि वैद्यकीय सेवा सुद्धा घेणार नाही, पाणीही घेणार नाही, अन्न घेणार नाही. मराठा

समाजाला न्याय मिळावा म्हणून कठोर उपोषण २५ तारखेपासून चालू केलं जाणार आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

राजकीय नेत्यांना गावबंदी

Manoj Jarange : मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आमच्या गावात एकाही महाराष्ट्रातील एकाही राजकीय नेत्याला येऊ देणार नाहीत

. आरक्षण घेऊनच गावात यायचं, नाहीतर आमच्या गावाच्या हद्दीपर्यंतही येऊ देणार नाहीत , असा इशारा सुद्धा मनोज जरांगे

यांनी दिला. प्रत्येक सर्कलमध्ये साखळी उपोषण, सगळ्या गावात

उपोषण सुद्धा होणार आहे. महाराष्ट्रातील गावा गावात साखळी उपोषणं सुरु केली जाणार आहेत. २८ तारखेपासून साखळी

उपोषणाचं रुपांतर आमरण उपोषणात होईल, असं देखील जरांगे म्हणाले.सगळ्या गावात सर्कलच्या ठिकाणी किंवा मोठ्या

गावाच्या ठिकाणी कायमस्वरुपी बसून राहायचं आहे. प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात प्रचंड संख्येनं मराठा समाजानं

एकत्र येऊन सरकारला जागं करण्यासाठी कँडल मार्च काढायचे आहेत असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.मनोज जरांगे

पाटील पुढे म्हणाले की ही दिशा आणि हे शांततेचं आंदोलन सुरु झाल्यानंतर सरकारला ते झेपू शकणार नाही. २५ तारखेनंतर ते

सरकारला झेपणार नाही. दोन टप्पे पाडल्याशिवाय मराठा समजाला न्याय मिळणार नाही. पण मात्र, सरकारनं ही गोष्ट

गांभीर्यानं घ्यावी, हे होणारं हे आमरण उपोषण आणि होणारे साखळी उपोषण महाराष्ट्रातील हे पाच कोटी मराठे चालवणार

आहेत. मराठ्यांचा आरक्षणाचा विषय मिटवावा लागेल, २५ तारखेला २८ च्या उपोषणाबाबत दिशा सांगितली जाणार आहे ती

तुम्हाला झेपणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकाला दिला.तुम्हाला ऐकताना हे सहज दिसत असणार आहे, पण हे

शांततेचं युद्ध होणार आहे. हे तुम्हाला झेपणार नाही. या विषयाची तुम्ही गांभीर्यानं दखल घ्या आणि मराठा समाजाला २४ तारखेच्या

आत आरक्षण जाहीर करा, अस सुद्धा ते म्हणाले.तुमच्या विचारात आजपासून बदल करा, गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी

सगळेजण साथ द्या, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. २००१ च्या जीआरच्या आधारे ओबीसीतील समावेशाचा जीआर घेऊन

नेत्यांनी यावं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. आमच्या डोक्यावर पाय देऊन कुणाला मोठं करायला निघाला आहात,

असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी केला.

Teacher Recruitment | मोठी बातमी! राज्यात तब्बल 32 हजार शिक्षक भरती; जाणून घ्या पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि भरतीचे ‘3’ टप्पे

Leave a Comment

error: Content is protected !!