Jalna News: मनोज जरांगेंच्या सभेसाठी मराठा समाज एकवटलेला आहे, १२३ गावांमधून लोकवर्गणी; अंतरवाली सराटी मध्ये तयारीला वेग

Jalna News: फक्त १२३ गावातून जमा होणाऱ्या वर्गणीतून होणार जरांगेंच्या सभेचा सगळा खर्च झाला.

सभेसाठी १२३ गावातील मराठा समाज एकवटला.अंतरवाली सराटीत १४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सभेच्या पूर्वतयारीला सुरुवात

हायलाइट्स:

मैदानाची साफसफाई, व्यासपीठ उभारणीच्या कामाला जोरात सुरुवात.

जवळपास सुमारे १०० एकर जागा तयार करण्यात येत आहे

१२३ गावातील समाजबांधव लोकवर्गणी जमा करुन करणार आहेत

जालना: अंतरवाली सराटीत १४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सभेच्या पूर्वतयारीला सुरुवात झालेली आली असून सभे

साठी मैदान व व्यासपीठ उभारणीच्या तयारीला आता वेग आलेला आहे. मराठा आरक्षणाविषयी च्या मागणीसाठी आपली पुढील

रणनीती ठरवण्यासाठी मनोज जरंगे येणाऱ्या १४ ऑक्टोबर रोजी जालन्यातल्या अंतरवाली सराटीत विराट सभा घेणार आहेत.

या विराट सभेसाठी मराठा समाजाकडून जय्यत तयारी करण्यात येत असून या सभेसाठी जवळपास सुमारे १०० एकर जागा तयार

करण्यात येत आहे.

सभेसाठी नियोजित स्थळाची साफसफाई सुद्धा करण्यात येत आहे आणि व्यासपीठ उभारणीचे काम सुददा  सध्या जोरात सुरू झालेले आहे.

१४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आयोजित भव्य सभेसाठी होणारा खर्च गोदाकाठची १२३ गावा मधील 

समाजबांधव लोकवर्गणी जमा करणार आहेत. यासाठी विद्युत व्यवस्था, साउंड सिस्टिम,मंडप,पाणी व्यासपीठ,पार्किंग व्यवस्था,

आसन व्यवस्थासोबत अनेक व्यवस्था व यासाठी मोठा खर्च सुद्धा होणार आहे आणि हा सर्व खर्च फक्त १२३ गावातील समाज

घरावरील सोलार योजना मिळणार १००% टक्के अनुदान येथे करा अर्ज

बांधवांच्या आर्थिक वर्गणी करूनच होणार आहे.या कामासाठी ५ जणांचे निधी संकलन मंडळ निवडण्यात आलेले आहे.

यामध्ये सुदामराव मुकणे, किशोर मरकड, ज्ञानेश्वर उढाण,सचिन मोटे, भाऊसाहेब नाटकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली

आहे. निधी संकलनासंबधी आचारसंहिता व नियमावली ठरविण्यात आली असून फक्त १२३ गावातूनच निधी घेतला जाणार

स्वीकारला जाणार आहे.निधी संकलन मंडळातील समावेश आहेत त्या वरील ५ सदस्यांकडेच आपल्या गावातला निधी जमा

करण्याचे ठरले आहे आणि याव्यतिरिक्त कुणीही, कुणाकडेही पैसे जमा करू नयेत,अथवा देऊ नयेत असे आवाहन करण्यात आले

आहे.१२३ गावाला दिलेला हा सम्मान समजून या महान कार्यात महत्वाचे योगदानाची जबाबदारी सर्व गावांनी स्वतः हून घेतली आहे.

या सभेसाठी कित्येक गावे पुढे सरसावली असून सभेच्या दिवशी येणाऱ्यांसाठी पुऱ्या, दशम्या,शेंगदाण्याची चटणी,ठेचा करण्याची

तयारी गावागावात चालू झालेली आहे. पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था सुद्धा केली जात आहे. याशिवाय येणाऱ्या वाहनांच्या

दुरुस्तीची जबाबदारी काहींनी घेतली असून गाड्यांचे पंक्चर,हवा भरणे,गाड्यांची किरकोळ दुरुस्ती विनामूल्य करून देण्यासाठी

परिसरातील मेकॅनिक सुद्धा पुढाकार घेत आहेत.त्यामुळे सर्वार्थाने ही सभा सर्वात गाजणार आहे.

खाद्य तेलाच्या दरात मोठी घसरण जाणून घ्या नवीन दर

Leave a Comment

error: Content is protected !!