Indian Flag Colour Fact : भारत सरकारने 26 जानेवारी 2002 रोजी भारतीय ध्वज संहितेत सुधारणा करून नागरिकांना कोणत्याही दिवशी त्यांच्या घरांवर,
कार्यालयात आणि कारखान्यांवर तिरंगा फडकवण्याची परवानगी दिली.
आपन 15 ऑगस्ट 2023 रोजी 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा होतो. यावेळी संपूर्ण देश तिरंग्याच्या रंगात लपेटलेला दिसत आहे.
पण तुम्हाला तिरंग्याचा इतिहास माहित आहे का?
तिरंग्याच्या भगव्या, पांढर्या आणि हिरव्या रंगांमागील अर्थ माहित आहे का? मध्यभागी तिरंग्याच्या असलेल्या अशोक चक्राचा अर्थ आता जाणून घ्या? चला तर मग जाणून घेऊया आपल्या तिरंग्याबद्दल अशाच काही खास गोष्टी…
तिरंग्याची कल्पना कशी सुचली? : Indian Flag Colour Fact
प्रत्येक स्वतंत्र देशाचा स्वतःचा राष्ट्रध्वज नक्कीच असतो. म्हणूनच स्वातंत्र्यलढ्याच्या काळातही देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांना राष्ट्रध्वजाची गरज भासू लागली.
1921 मध्ये, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बैठकीत महात्मा गांधींनी संपूर्ण देश एकसंघ व्हावा म्हणून राष्ट्रध्वज सुचवला.
आंध्र प्रदेशात जन्मलेल्या पिंगली व्यंकय्या यांनी प्रथमच देशाच्या ध्वजाची रचना केली.
तिरंगा कधी स्वीकारण्यात आला?
भारताच्या सुरुवातीच्या ध्वजाच्या मध्यभागी एक चरखा ठेवण्यात आला होता.
पुढे जाऊन, ध्वजाच्या मध्यभागी पांढरा रंग जोडला गेला आणि 1947 मध्ये अशोक चक्राने चरख्याची जागा घेतली.
स्वातंत्र्याच्या आधी काही दिवस 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने आपला तिरंगा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला आहे.
तिरंग्याच्या सर्व रंगांचा अर्थ काय?
तिरंग्यात भगवा, पांढरा, हिरवा या सर्व रंगांमागे एक अनोखा संदेश दडलेला आहे.
राष्ट्रध्वजातील भगवा रंग देशाच्या सामर्थ्याचे आणि धैर्याचे प्रतीक आहे. मध्यभागी असलेला पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे.
तर, हिरवा रंग सुपीकता, समृद्धी आणि जमिनीच्या शुद्धतेचे प्रतीक आहे.
त्याचबरोबर तिरंग्याच्या मधोमध असलेले अशोक चक्र मानवातील गुण दाखवण्यासोबतच सर्वांगीण विकास, प्रगती, सातत्य आणि कर्तव्याचा संदेश देते.
तिरंगा फडकवण्याचे नियमही जाणून घ्या
26 जानेवारी 2002 रोजी, भारत सरकारने भारतीय ध्वज संहितेत सुधारणा केली,
ज्यामुळे नागरिकांना कोणत्याही दिवशी त्यांच्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी तिरंगा फडकविण्याची परवानगी दिली गेली.
तिरंगा उशी किंवा टेबल कव्हर, बेडशीट म्हणून वापरण्यास सक्त मनाई आहे. तिरंगा नेहमी उजव्या हातात ठेवावा.
तसेच आपन जेव्हा राष्ट्रध्वज प्रदर्शित केला गेला तेव्हा तो संपूर्ण पणे प्रदर्शित केला पाहिजे.
ध्वजाला जाणून बुजून जमिनीला स्पर्श करण्यासही मनाई आहे.