Importance of Vermicompost : गांडूळ खत बनला आधुनिक शेतीच कैवारी ; लवकर वाढते जमिनीची सुपीकता
वातावरणातील बदल, निसर्गाची अनिश्चितता, मातीचा होणारा ऱ्हास, रासायनिक खतांच्या अति वापराणे कमी होत चालेली जमिनीची सुपीकता;
त्याचा थेट परिणाम पिकांच्या कमी होत चाललेल्या उत्पन्ना वरती होताना दिसतो आहे. रसायनिक खतांच्या आती वापरामुळे शेती करणे अवघड झाले.
आता आपण रासायनिक सुपीकता भौतिक व सेंद्रिय सुपिकतेने सुधारता येऊ शकते.
बाजारात अन्नधान्यांची मागणी वाढत्या लोकसंखेमुळे दिवसेंदिवस वाढत वाढत आहे परंतु जमिनीची उपलब्धता कमी कमी होत आहे तसेच जमिनीतील सेंद्रिय कार्बाचे प्रमाण कमी झाले आहे,
सूक्ष्मजीवांची मोठ्या प्रमाणात घटत चालली आहे, जमिनीची सुपीकता व उपजाऊक शक्ती खूप कमी होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम उत्पन्ना वरती होत आहे.
तसेच आपल्याला शेती करताना सेंद्रिय खतांचा वापर मोठ्या प्रमाणात केला पाहिजे जेणेकरून मातील इजा होणार नाही. सेंद्रिय खतांमध्ये विविध प्रकार उपलब्ध आहेत.
त्यामध्ये गांडूळ खत हा गुणकारी पर्याय शेतीचे आरोग्य सुधारण्यासाठी आहे.
गांडूळ खत म्हणजे काय?
गांडूळ म्हणजे जमिनीत राहून सेंद्रिय पदार्थ आणि माती खाऊन स्वतःची भूक भागवणारा प्राणी आहे. एका लहान गांडूळाचे वजन १० ग्रॅम असते आणि तो आपल्या वजनाएवढी माती सेवन करतो.
त्या मातीतला १० % भाग तो त्याच आण्ना साठी वापरतो. मातीचा 90% भाग शरीरातून बाहेर विष्ठा म्हणून बाहेर टाकतात,
त्यालाच आपण गांडूळ खत म्हणतो किंवा त्यालाच आपन वर्मिकंपोस्ट असेही म्हणू शकतो. गांडूळाचे तीन प्रकार असतात. पुढील गांडूळचे तीन प्रकार असतात एपिजिक, एण्डोजिक, अॅनेसिक.
गांडुळाचे प्रकार:
एपिजिक : हा गांडूळ आकाराने लहान असते परंतु त्याची लांबी १.०-१.८ सेंमी असते व जास्त प्रमाणात सेंद्रिय
पदार्थ असलेल्या भागात राहतात. ते मातीच्या पृष्ठभागाजवळ किंवा जवळपास राहतात आणि पानांच्या कचरा, झाडाची मुळे किंवा शेण खातात.
हा गांडूळ राहण्यासाठी बीळ तयार करत नसतो. एपिजिक प्रजातींमध्ये गडद रंग त्वचेचा व प्रजननाचा दर सर्वात जास्त आसतो असतो.
एण्डोजिक: हा गांडूळ २.५-३.० सेंमी लांब असते. हा जमिनीत २० सेंमी खोलीपर्यंत राहू शकतात. एंडोजेनिक गांडुळे जास्त प्रमाणात माती कतात व त्यातील सेंद्रिय पदार्थ खातात,
कधी कधी खाद्य शोधण्यासाठी वर येतात. ते कधीतरी राहण्यासाठी उथळ जागेवरती बीळ बनवतात. रंग फिकट व प्रजननाचा दर कमी राहतो.
अॅनेसिक: एक मीटर खोलीपर्यंत हा गांडूळ जमिनीत राहू शकतो कमीत कमी; माती सेवन करून सेंद्रिय पदार्थ बनवतात.
मातीच्या पृष्ठभागाच्या खाली ३ मीटर खोलीपर्यंत कायम स्वरुपी आकार लहान असून राहतात. मातीमधून सेंद्रिय पदार्थ घेतात व ते मातीच्या पृष्ठभागावरुन अन्न गोळा क्रयला सक्रिय असतात.
याचा आकार जवळजवळ ३.०-१.४ मी लांब असू शकतो.
गांडूळ खत बनवण्यासाठी लागणारी सामग्री
400 gsm च्या ताडपत्री पासून तयार.
Size. 12x4x2
योग्य जागा कशी निवडावी-
खत आणि बियाणांचे दुकान उघडण्यासाठी किती शिक्षण आसवे?
गांडूळ खत तयार करण्यासाठी योग्य जागा म्हणजे सावली, उच्च आर्द्रता आणि थंडावा असलेल्या ठिकाणी. तसेच छपराचे,
पत्र्याचे शेड किंवा पोल्ट्री शेड किंवा न वापरलेल्या इमारती यांचा पण आपण वापर करू शकतो. किवा मोकळ्या वातावरनात तयार करायचे असेल तर सावलीच्या ठिकानी तयार करणे योग्य असेल.
उन्हापासून व पावसापसुन संरक्षण करण्यासाठी छप्पर योग्य राहील.
गांडूळखतासाठी गांडुळाच्या योग्य जाती : Importance of Vermicompost
जगत ३००० हून अधिक जाती गांडूळच्या आढळतात, त्यापैकि ३०० पेक्षा ज्यास्त जाती भारतात आहेत. अंदाजे गांडुळांचे आयुष्य प्रजातिनुसार ठरते. १-१० वर्षा पर्यंत असते.
त्यासाठी प्रामुख्याने ईसिना फोइटीडा, युड्रीलस युजेनिया, पेरीनोक्सी, एक्झोव्हेटस, फेरीटीमा इलोंगेटा या गांडूळांच्या जाती योग्य व मोठ्या प्रमाणात खत निर्मितीसाठी वापरल्या जातात,
कारण या जातीची वाढ चांगली होते व खत तयार करण्याची प्रकिया सरासरी ४० ते ४५ दिवसात पूर्ण होते.
गांडूळ खत निर्मितीसाठी लागणारे पदार्थ:
टाकाऊ पासून असे बनवा खत:
ऊसाचे पाचरट, सरमाड, पेंढया, कडबा, कोंडा, पालापाचोळा आणि गवत, फळझाडे आणि वनझाडांचा पालापाचोळा, वाळलेल्या फांद्याची कुट्टी इ.
जनावरांपासून मिळणारी सामग्री: शेण, मूत्र, शेळ्याचा लीद, कोंबड्यांची विष्ठा, इ.
हिरव्या खाद्यापासून: ताग, धैंचा, जनावरांच हिरवा टाकाऊ चारा, गिरीपुष्प, शेतीतील तण इ.
घरातील केरकचरा : उदा. भाज्यांचे टाकाऊ अवशेष, घरातील केर, फळांच्या साली, शिळे अन्न इ.
कशी कराल बांबूची लागवड? शासनही देतंय 100% अनुदान..
ढीग पद्धत:
गांडूळ खत तयार करण्याची पध्दत-
६.० फुट लांब, २ फूट रूंद आणि २ फूट उंचीचे ढीग असला हवेत. थर अंथरण्याआधी जमीनवरती पाणी शिंपडू…