महाराष्ट्रासाठी शिफारशीत हरभऱ्याच्या ‘या’ दिलेल्या 3 वाणाची पेरणी करा, 35 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवा, सविस्तर जाणून घ्या

Harbhara Lagwad : सध्या महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापूस हार्वेस्टिंग चालू आहे. विशेष म्हणजे नवीन सोयाबीन आणि

कापूस बाजारात विक्रीसाठी दाखल सुद्धा झाला आहे. नवीन मालाला मात्र अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकरी बांधव

थोडे चिंतेत आहेत.आता कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे.

यामुळे सणासुदीच्या काळात शेतकरी बांधव संकटात येतात . दरम्यान येत्या काही दिवसात महाराष्ट्रात रब्बी हंगामाला देखील

सुरुवात होणार आहे. यंदाच्या रब्बी हंगामात शेतकरी बांधव हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्याची शक्यता देखील

आहे.बऱ्याच ठिकाणी कमी पावसामुळे रब्बी पिक पेरणी होणार की नाही याबाबत शंका आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची

उपलब्धता होत आहे ते शेतकरी बांधव रब्बी हंगामात गहू आणि

हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी करतील असे सांगितले आहे.दरम्यान आज आपण या आगामी रब्बी हंगामातून हरभरा

पिकातून दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर शेतकरी बांधवांनी कोणत्या जातींची निवड केली पाहिजे याविषयी

थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.हरभऱ्याच्या सुधारित जातीBDN – 797 : या सुद्धा जातीला आकाश या

नावाने ओळखले जाते. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये हरभऱ्याचा हा वाण विशेष लोकप्रिय आहे. खरंतर या जातीची लागवड

मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणात पाहायला भेटते.विशेष तर हा वाण परभणी विद्यापीठाने विकसित केला असून मराठवाडा

विभागासाठी शिफारशीत आहे. या देखील जातीचे पीक 105 ते 110 दिवसात परिपक्व होते. पेरणीसाठी 25 ते 28 किलो

बियाणे वापरल्यास या जातीपासून चांगली उत्पादन मिळते.

Harbhara Lagwad :या देखील जातीच्या हरभऱ्याच्या दाण्याचा आकार मध्यम च असतो.BDN – 9 – 3 : हरभऱ्याचा देखील एक सुधारित वाण

आहे. हा वाण महाराष्ट्रातील परभणी कृषी विद्यापीठाने विकसित केला आहे . पीक पेरणीनंतर सरासरी 100 ते 105 दिवसात या

जातीचे पीक परिपक्व बनते. हा वाण BDN 797 या जातीपेक्षा लवकर परिपक्व होतो.या जातीची लागवड करायची असल्यास

प्रत्येक एकरी 20 ते 25 किलो बियाणे वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.या जातीची विशेषता म्हणजे हा वाण पाण्याचा ताण

सहन करतो, तसेच मनरोगास प्रतिकारक आहे आणि दाण्याचा आकार लहान असतो.दिग्विजय : हा एक मोठ उत्पादन देणारा

आणि महाराष्ट्रासाठी शिफारशीत वाण आहे. हे वाण

अहमदनगरच्या राहुरी कृषी विद्यापीठाने अर्थातच महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केला आहे. या जातीची

लागवड सुद्धा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते. या जातीचा पीक परीपक्व कालावधी 105 ते 110 दिवस एवढा

आहे.पेरणीसाठी एकरी 30 किलो बियाणे वापरण्याचा सल्ला दिला जातो. बागायती आणि कोरडवाहू क्षेत्रासाठी उपयुक्त आहे.

ही जात उशिरा पेरणीसाठी उपयुक्त आहे. दाणे मध्यम आकाराचे असतात आणि मररोगास प्रतिकारक आहेत. या जातीपासून

बागायती भागातून 30 ते 35 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जात आहे .

आता पेट्रोल + बॅटरी दोन्हीवर चालणार हि स्कूटर, किती मिळणार मायलेज

Leave a Comment

error: Content is protected !!