6000mAh बॅटरी आणि 256GB स्टोरेजसोबत Samsung 5G Phone लाँच; किंमत परवडणारी आहे

Galaxy M34 5G चा २५६जीबी स्टोरेज व्हेरिएंट भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. हा नवीन मॉडेल २४,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. स्टोरेज व्यतिरिक्त फोनच्या

फीचर्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.सॅमसंगनं जुलै २०२३ मध्ये ‘एम’ सीरीज अंतगर्त Samsung Galaxy

M34 5G स्मार्टफोन लाँच केला होता. लाँचच्या वेळी १२८जीबी स्टोरेजसह कंपनीनं ६जीबी रॅम आणि ८जीबी रॅम व्हेरिएंट सादर

केले होते. परंतु आता कंपनीनं ह्या हँडसेटचा एक नवा मॉडेल सादर केlela आहे ज्यात 256GB Storage मिळते. चला

जाणून घेऊया नव्या मॉडेलची किंमत आणि सविस्तर माहिती.Samsung Galaxy M34 5G ची किंमतगॅलेक्सी

एम३४ ५जी फोनच्या नवीन व्हेरिएंटमध्ये २५६जीबी स्टोरेजसह ८जीबी रॅम मिळतो, ज्याची किंमत किंमत २४,४९९ रुपये

ठेवण्यात आली आहे. तर जुन्या ८जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज मॉडेल १८,४९९ रुपयांमध्ये तर ६जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज

मॉडेल १६,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. सॅमसंग ह्या फोनवर १,५०० रुपयांचा बॅक डिस्काउंट सुद्धा देत

आहे.Samsung Galaxy M34 5G चे स्पेसिफिकेशन्सह्या

फोनमध्ये ६.५ इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही वॉटरड्रॉप नॉच असेलली सुपर अ‍ॅमोलेड स्क्रीन १०८० x २३४०

पिक्सल रिजोल्यूशन, १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, १००० निट्झ ब्राइटनेस आणि विविड बूस्टर टेक्नॉलॉजीला सुद्धा सपोर्ट करत

आहे. स्क्रीनला कोर्निंग गोरिल्ला ग्लास ५ ची सुद्धा सुरक्षा देण्यात आलेली आहे.डिवाइसयामध्ये कंपनीचा एक्सनॉस १२८०

ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. जो २.४गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो. सोबत ८जीबी रॅम प्लस फीचर

आहे. ह्या टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फिजिकल ८जीबी रॅम मध्ये ८जीबी वचुर्अल रॅम जोडून हा १६जीबी पर्यंत वाढवता

येईल.गॅलेक्सी एम३४ ५जी च्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड

अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेंन्सर सुद्धा दिलेला

आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे. हा फोन ६,०००एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आला आहे. जी २५वॉट

फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फुल चार्जमध्ये हा फोन २ दिवसांचा बॅकअप देऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे.

“मुख्यमंत्री शिंदे शब्दाला पक्के, संध्याकाळपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा…”, जरांगे-पाटलांचा सूचक इशारा

Leave a Comment

error: Content is protected !!