भारतीयांचा परदेशी शिक्षण,व्यसायाकडे कल वाढतोय का ?

भारतीयांचा परदेशी शिक्षण,व्यसायाकडे कल वाढतोय का ? : ( स्वदेशासाठीफक्त पूर्ण वाचू नका त्यावर विचार करा,तेव्हा खरा सार्थ समजेल,सर्व बाजू विचारात घेवून स्वमत मांडले आहे)

एकेकाळी आपल्या देशास सोने की चिडिया असणारा देश संबोधतले जायचे कारण ह्या पवित्र देशात सर्व गोष्टींची भरभराट होती मग ती शिक्षणाची असो की व्यवसायाची.

आपलं प्राचीन ज्ञान मानवी जीवनासाठी किती उपयोगाचे आहे हे फक्त चार वेदांचा अभ्यास केला तरीही समजते.

आर्यभट्ट,चाणक्य,स्वामी विवेकानंद ह्यांच्यासारखे थोर अभ्यासक येथे होऊन गेले ,

आणि त्यांनीच भारतीय ज्ञानाचा पाया ह्या मातीत पेरला व त्या विचारातूनच देशात आमूलाग्र बदल,चळवळी घडल्या.

नालंदा,तक्षशिला ही प्रसिद्ध विद्यापीठे होती,जिथे जगभरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असत अशी ही अभिमानास्पद शिक्षणपद्धती पुढे चालत राहिली.

   परंतु आताची परिस्थिती आणि लोकमत सांगण्यास दुःख होते की,बहुतांश भारतीय लोक/विद्यार्थी ह्यांना विदेशी शिक्षण/व्यवसाय

सोयीस्कर वाटतोय कारण विदेशात अनेक संधी,कमी पैशात शिक्षण,रोजगार मिळेल असा त्यांचा समज असतो.

आपण विदेशात जाऊन शिक्षण घेतो इथपर्यंत ठीक आहे परंतु स्वभुमित येऊन त्याच शिक्षणाच्या उपयोग येथील समाजासाठी करतो का?

भारतीयांचा परदेशी शिक्षण,व्यसायाकडे कल वाढतोय का ?

ह्यांचे उत्तर बहुतांश नाही असे असेल अपवादही असतील काही परंतु जेव्हा शिक्षणासाठी,व्यवसायासाठी विदेशात जातो तेव्हा विदेशी लोक,कंपन्या आपल्याला अश्या ऑफर्स दाखवतात की  तिथलेच कायमस्वरुपी रहिवाशी होते

आणि एक स्वदेशी माणूस आपले कष्ट,बुध्दिमत्ता विदेशाच्या प्रगतीसाठी फक्त काही पैशाच्या मोबदल्यासाठी गहाण ठेवतो.

पैसे भेटतात परंतु प्रगती विदेशची होते.ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की आपण सुंदर अश्या भारतराष्ट्रास,इथील परिवरास विसरतो.

  हेच सगळे व्यवसायिक स्वदेशात जे विदेशात काम करणार आहोत तेच केलं तर देशाची किती प्रगती होईल आणि ज्या काही अडचणी असतील त्या एकमेकांमध्ये सोडवल्या जातील,

परंतु त्यासाठी स्वदेशात एकत्र काम करण्याची मानसिकता तयार केली पाहिजे त्याशिवाय राष्ट्रउन्नत्ती होणे कठीण आहे.

ज्या राष्ट्राने,स्वराज्याच्या कुशीत वाढलो इथिल अन्न खाऊन मोठे झालो,मग ह्या देशात काम करायला कसली लाज?व्यवसायाच्या संधी कदाचित नसतील तर आपण त्याचे क्षेत्र आणि ठिकाण बदलू शकतो.

कदाचित थोडे पैसे कमी मिळतील परंतु समाधान तर नक्की मिळू शकते ना.

इतर देशातलं वातावरण , संस्कृती,भोजन आणि हवमान आपल्याला पचल का ?

आणि मूळ प्रश्न येतो सुरक्षेचा आणि युक्रेनरशिया युध्याच्या काळात कितीतरी लोक स्वदेशात परतले हे तर जगाने पाहिलच आहे.

शिक्षण विदेशात झाल परंतु त्याचा उपयोग स्वदेशत होवा.

विदेशी शिक्षण,नोकरी विरोध नाही परंतु प्रत्येक गोष्टीस नाण्याप्रमाने असणाऱ्या दोन्हीही बाजू पडताळणे गरजेचे आहे,शेवटी निर्णय हा व्यक्तिकच असतो.

How to Withdraw Money from closed Account : आता बंद पडलेल्या खात्यातून काढता येणार पैसे

Leave a Comment

error: Content is protected !!