
Covid-19 New Variant Updates: अमेरिकेतील (US) नागरिक आधीच श्वासोच्छवासाचा व्हायरस ‘व्हाइट लंग सिंड्रोम’
(White Lung Syndrome) बेजार झाले असताना कोविड 19 चा नवा व्हेरिएंट एचव्ही.
1 (HV.1) समोर आला आहे. एचवी.1 (HV.1) व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत आहे.
भारतातही जेएन.1 (JN.1) ने दस्तक दिली आहे. कोरोनाचा हा धोकादायक व्हेरिएंट मानला जात आहे
New Variant Updates: अमेरिकेतील (US) नागरिक आधीच श्वासोच्छवासाचा व्हायरस ‘व्हाइट लंग सिंड्रोम’ने (White Lung Syndrome) बेजार झाले
असताना कोविड 19 चा नवा व्हेरिएंट एचव्ही.1 (HV.1) समोर आला आहे.
एचवी.1 (HV.1) व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत आहे. भारतातही जेएन.1 (JN.1) ने दस्तक दिली आहे.
कोरोनाचा हा धोकादायक व्हेरिएंट मानला जात आहे.
Covid-19 New Variant In Kerala: भारतातील केरळ राज्यात कोविड -19 चा नवा व्हेरिएंट जेएन.1 (JN.1) ने दस्तक दिली आहे.
जेएन.1 हा कोरोनाचा धोकादायक व्हेरिएंट मानला जात असून त्याने पुन्हा एकदा नागरिकांची डोकेदुखी वाढवली आहे.
केरळ राज्यात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट अमेरिकेतून (US) भारतात आल्याचे बोलले जात आहे.
Covid-19 New Variant Updates मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील नागरिक आधीच श्वासोच्छवासाचा व्हायरत विषाणू ‘व्हाइट लंग सिंड्रोम’ने (White Lung Syndrome) बेजार झाले आहेत.
त्यात कोविड 19 चा नवा व्हेरिएंट एचव्ही.1 (HV.1)ने डोके वर काढले आहे. अमेरिकेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये HV.1 चा प्रसार झपाट्याने झाला होता.
आता हाच व्हायरस केरळमध्ये पोहोचला आहे. केरळमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे.
त्यात हिवाळा सुरू असल्याने कोरोनाबाधीत रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.
कोरोनाचा नवा सबव्हेरिएंट जेएन.1 (JN.1) हा पिरोला किंवा बीए.2.86 (BA.2.86) चा वंशज असल्याचे सांगितले जात आहे.
जेएन.1 (JN.1) च्या वाढत्या केसेसमुळे केरळच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे.
हिवाळ्यात जेएन.1 च्या रुग्णांमध्ये वाढ होणार असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
केरळमध्ये COVID-19 चा सबव्हेरिएंट JN.1 दाखल
केरळमध्ये कोरोनाचा नवा सबव्हेरिएंट JN.1 दाखल झाल्याच्या वृत्ताला भारतीय सार्स-सीओवी 2 (SARS-CoV-2) जीनोमिक्स कंसोर्टियमने (INSACOG) दुजोरा दिला आहे.
- सतत वाहणारे नाक
- ताप
- खोकला
- थकवा जाणवणे
- सर्दी
- अतिसार
भारतात, विशेषत: केरळमध्ये अलीकडच्या काळात COVID-19 प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
त्यामागे JN.1 हा एक प्रमुख घटक असू शकतो, अशी माहिती नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) कोविड टास्क फोर्सचे व्हाईस प्रेसिडेंट डॉ. राजीव जयदेवन यांनी दिली आहे.
JN.1 ची लक्षणे कोणती?
भारतात कोविड रुग्णसंख्तेत वाढ
भारतात कोविड रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे.
केरळ राज्यात सर्वाधिक 768 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
तर भारतात एकून सक्रिय रुग्णांची संख्या 938 वर पोहोचली आहे.
युरोपमध्ये ऑगस्ट 2023 मध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन.1 पहिल्यांचा आढळला आला होता.
लक्झेंबर्गमध्ये पहिल्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर इंग्लंड, आइसलंड, फ्रान्समार्गे हा व्हायरस अमेरिकेत पोहोचला होता.
आता अमेरिकेतून हा व्हायरस भारतात दाखल झाला आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी JN.1 या कोरोनाच्या व्हेरिएंटला अत्यंत धोकादायक श्रेणीत ठेवले आहे.
कोरोना प्रतिबंधित लसीचा देखील यावर कोणताही परिणाम होत नाही, अशी चिंता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.