सतत Bluetooth किंवा Wireless Headphones चा वापर करताना सावधान, होऊ शकतो गंभीर आजार

Bluetooth किंवा Wireless Headphones चा वापर

Bluetooth किंवा Wireless Headphones चा वापरब्लूटूथ इयरफोन्सचा अति वापर करणं किती धोकादायक आहे? सातत्याने ब्लू-टूथ इयरफोन्स वापरल्याने आरोग्याच्या अनेक समस्याही (health problems) उद्भवू शकतात.

परंतु या वायरलेस डिव्हाइसेसमधून बाहेर पडणारी रेडिओ फ्रिक्वेन्सी (radio frequency) रॅडिएशन्स (radiations) आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत.

ब्लूटूथ चा धोका

Bluetooth Earphones, earbuds चा वापर आता सर्रास केला जातो. अनेक जण ऑफिसमध्ये असताना, तसंच प्रवासात असताना दिवसभर ब्लू-टूथ इयरफोन्सचा वापर करतात, पण ब्लूटूथ इयरफोन्सचा अति वापर करणं किती धोकादायक आहे

? सातत्याने ब्लू-टूथ इयरफोन्स वापरल्याने आरोग्याच्या अनेक समस्याही (health problems) उद्भवू शकतात.

इयरफोन्स, हेडफोन आणि इयरबड्समधून गाणी ऐकण्याची फॅशन आता वाढली आहे. तसंच, दोन हात कायम मोकळे राहायला हवेत म्हणून फोनवर बोलण्यासाठीही त्यांचा वापर केला जातो.

जागा कोणतीही असो, लोकांकडे वायरलेस इयरफोन्स असतात. अशा इयरफोन्सचा वापर करणं लोकांना आवडतं.

कोलोरॅडो विद्यापीठाच्या (The University of Colorado) जेरी फिलिप्स (Jerry Phillips) यांनी या विषयावर संशोधन केलं असून, त्यामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अतिवारामुळे होणारे रोग

मेंदूचा कर्करोग, न्यूरोलॉजिकल आणि आनुवंशिक विकार, स्मरणशक्ती कमी होणं

असे काही धोकादायक विकार वायरलेस इयरफोन्सवर दीर्घ काळ गाणी ऐकल्यामुळे किंवा त्यांचा वापर केल्यामुळे होऊ शकतात

Bluetooth किंवा Wireless Headphones चा वापरवायरलेस हेडफोन्स, इयरफोन्स, इअरबड्स आदींचा जास्त काळ वापर केल्यास त्यामधून बाहेर पडणारी रेडिओ फ्रिक्वेन्सी रॅडिएशन्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आरोग्याला हानी पोहोचवू शकतात.

जेरी फिलिप्स यांच्या मते, 42 देशांतल्या 247 शास्त्रज्ञांनी या वायरलेस डिव्हाइसेसमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेकडे याचिका दाखल केली होती.

लहान इयरफोन्स किंवा इअरबड्सच्या वापरामुळे होणाऱ्या परिणामांवर भर देण्यात आला होता.

शास्त्रज्ञांच्या मते, लहान इयरफोन्स आणि इअरबड्स खूप धोकादायक असतात. कारण ते कानात घातले जातात आणि त्यांच्यापासून बाहेर पडणारी रॅडिएशन्स कान आणि मेंदू अशा दोन्हींना हानी पोहोचवतात.

या नॉन-आयनायझिंग रेडिएशन्सच्या सतत संपर्कात आल्याने मेंदूच्या ऊतींचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे न्यूरोलॉजिकल रोग होतात.

ही रेडिएशन्स मेंदूमध्ये वाढणारी कोणतीही गाठ वाढवण्यासाठीदेखील मदत करू शकतात. त्यामुळे मेंदूचा कर्करोग होण्याची शक्यता असते.

सतत इयरफोन्सचा वापर करून गाणी ऐकल्याने कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम होतो.

डोकेदुखी, श्रवणशक्ती कमी होणं आणि बहिरेपणा येणं आदी त्रास होऊ शकतात.

तसंच, कधी दुसऱ्या व्यक्तीचे इयरफोन्स वापरल्यास कानात इन्फेक्शन होण्याची भीती असते.

टिनिटस नावाचा रोगदेखील होण्याचा धोका असतो.

मोठ्या आवाजात गाणी ऐकण्याच्या सवयीमुळे, आपण गाणी ऐकत नसलो तरीही आपल्या कानात एक आवाज ऐकू येत आहे, असं आपल्याला या आजारामुळे वाटतं. या आजारात चक्करसुद्धा येते.

आजकाल लहान मुलंसुद्धा मोबाइल फोन आणि टीव्हीच्या स्क्रीनला चिकटलेली असतात. अशा परिस्थितीत त्यांनाही इयरफोन्स वापरण्याची सवय झाली आहे.

काही संशोधकांच्या मते, या इयरफोन्सची रेडिएशन्स लहान मुलं आणि गर्भवती महिलांसाठी जास्त धोकादायक असतात

रेडिएशन्समुळे गरोदर स्त्रियांमध्ये धोका जास्त वाढतो. तसंच मुलांच्या मेंदूवरदेखील परिणाम होऊ शकतो.

मोठ्या व्यक्तींपेक्षा लहान मुलांना या रेडिएशन्समुळे जास्त धोका आहे. मुलांच्या मेंदूच्या ऊतींचं खूप नुकसान होऊ शकतं.

हे करा उपाय

स्वतःला असं ठेवा सुरक्षित —

वायरलेसऐवजी वायर्ड इयरफोन वापरा किंवा स्पीकरवर गाणी ऐका.

– फोनवर बोलताना इयरफोन व फोन यामध्ये 10 इंच अंतर ठेवा आणि ही गॅजेट्स वापरत नसताना त्यांना तुमच्या शरीरापासून दूर ठेवा.

– दीर्घ काळ गाणी ऐकण्यासाठी किंवा व्हिडीओ पाहण्यासाठी स्पीकर्स वापरा.

– जेव्हा वायरलेस डिव्हाइसेस वापरत नाही, तेव्हा ती गळ्यातून किंवा कानातून काढून टाका.

– दिवसातून 60 मिनिटांपेक्षा जास्त काळ इयरफोन्स वापरणं हानिकारक आहे, असं संशोधकांचं मत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!