आभा हेल्थ कार्ड!ABHA हेल्थ कार्ड काय आहे? ते ऑनलाईन कसं काढायचं?

आभा हेल्थ कार्ड!

आभा हेल्थ कार्ड! आभा हेल्थ कार्ड ही खऱ्या अर्थानं नागरिकाच्या आरोग्याची कुंडलीच आहे,” असं म्हणत हे कार्ड बनवून घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला केलं आहे.

आभा हेल्थ कार्ड काय आहे?

आभा (ABHA) म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट नंबर. हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे ज्यात नागरिकांच्या आरोग्याशी आभा हेल्थ कार्ड! संबंधित माहिती साठवली जाईल.

आभा हेल्थ कार्ड!

हे कार्ड एकप्रकारे आपल्या आधार कार्डसारखं असेल आणि यावर एक 14 अंकी नंबर असेल. याच नंबरचा वापर करून रुग्णाची सगळी मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना माहिती होऊ शकेल.

यात कोणत्या व्यक्तीच्या कोणत्या आजारावर इलाज झाला? तो कधी व कोणत्या दवाखान्यात झाला? कोणत्या टेस्ट करण्यात आल्या? कोणती औषधं देण्यात आली?

रुग्णाला आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या आहेत? तो कोणत्या आरोग्यविषयक योजनेशी जोडला गेलाय? ही सगळी माहिती या कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीनं साठवली जाईल.

या कार्डवरील युनिक आयडीचा वापर करून डॉक्टर तुमच्या आरोग्याशी संबंधित डेटा पाहू शकतील. पण, त्यासाठी तुमची संमती अनिवार्य असेल.

याशिवाय तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा हे कार्ड म्हणजेच तुमचं आरोग्यविषयक रेकॉर्ड डिलीटही करू शकाल.

या कार्डचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे दवाखान्यात जाताना तुम्हाला आधीच्या डॉक्टरांची चिठ्ठी, गोळ्यांची कागदं सोबत न्यायची गरज पडणार नाही. तुम्ही आभा नंबर सांगितला की डॉक्टर तुमचा पूर्वीचा आरोग्यविषयक डेटा पाहू शकतील. त्यामुळे समजा तुमच्याकडे जुन्या टेस्टचे रिपोर्ट नसले तरी पुन्हा सगळ्या टेस्ट करायची गरज पडणार नाही. यामुळे वेळ आणि पैशाची बचत

आभा हेल्थ कार्ड कसं बनवायचं

आभा हेल्थ कार्ड तुम्ही सार्वजनिक आणि खासगी दवाखाने, सामुदायिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र इथं जाऊन बनवू शकता. किंवा मग घरबसल्या ऑनलाईनही बनवू शकता.

चिंता कसली?आभा कार्डचे फायदे आपण पाहिलेच. पण, यामुळे प्रायव्हसी आणि सायबर सेक्युरिटीचा प्रश्न निर्माण होईल, अशी चिंता सायबर तत्ज्ञांना वाटते.

या हेल्थ कार्डमध्ये आपली सगळी माहिती डिजिटली ठेवली जाणार आहे. या माहितीला एका सर्व्हरवर एकत्र केलं जाणार आहे.

खासगी पद्धतीनं सुरक्षित वातावरणात लोक त्यांचा डेटा सांभाळून ठेवू शकतील, असा सरकारचा दावा आहे.पण, सायबर सुरक्षाविषयक तत्ज्ञ यासंबंधीच्या धोक्याची पूर्वसूचना देत आहेत.

एखादा डेटा एखाद्या सर्व्हरवर ठेवला आहे, तर त्याच्या सुरक्षेसाठी तुम्ही सरकारवर अवलंबून राहता, असं त्यांचं म्हणणं आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!