फळ पिकांसाठी 2 लाखांपर्यंत अनुदान ; ‘रोहयो’अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी घेतला लाभ; या 15 फळ पिकांसाठी मिळतंय 2 लाखांपर्यंत अनुदान,

फळ पिकांसाठी 2 लाखांपर्यंत अनुदान ;

फळ पिकांसाठी 2 लाखांपर्यंत अनुदान ; महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतामध्ये बांधावर पडीक जमिनीवर फळबाग इतर वृक्ष लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना 3 वर्षात 100 टक्के अनुदान आहे.

या अनुषंगाने किनवट तालुक्यातील 88 शेतकऱ्यांनी एकूण 6.05 हेक्टर जमिनीवर तब्बल 58 हजार 627 विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड करून त्याचा लाभ घेतला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिली.

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवड करून आर्थिक उन्नती साधावी यासाठी शासनाकडून शंभर टक्के अनुदान देऊन प्रोत्साहित केले जात आहे.

अल्प व अत्यल्पभूधारक (पाच एकरांच्या आतील) शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (MREGS) व पाच एकरावर जमीन असणाऱ्या |शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर योजना राबविली जात आहे.

फळ पिकांसाठी 2 लाखांपर्यंत अनुदान ;

लागवड करण्यासाठी खूप योजना असतात बहुतांश शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या योजनेतून लागवड करतात

. राज्यभरात गेल्या तीन वर्षात दरवर्षी प्रत्येकी 60 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले होते.

लागवडीला मोठा प्रतिसाद मिळत आहे .

त्यामुळे प्रत्येक वर्षी 40 हजार हेक्टरपेक्षा अधिक म्हणजे उद्दिष्टाच्या 80 ते 90 टक्क्यांपर्यंत फळबाग लागवड झाली आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड करताना एप्रिल, मे महिन्यातच नियोजन करून खड्डे खोदले जातात.

पावसाला सुरुवात झाली की, जून ते सप्टेंबर कालावधीत जास्तीत जास्त फळबाग लागवड केली जाते.

यंदा मात्र सुरुवातीपासूनच पाऊस पडला नाही.

त्याचा लागवडीवर परिणाम झाल्याचे दिसून येत असून नांदेड जिल्ह्यात यंदा उद्दिष्टाच्या केवळ 33.87 टक्के लागवड झाली आहे.

यापैकी किनवट तालुक्यामध्ये फळबाग योजनेअंतर्गत 75 हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

त्यासाठी किनवट तालुक्यातील एकूण 210 शेतकऱ्यांच्या अर्ज संमत करुन प्रशासकीय मंजूर प्राप्त झाली होती.

त्यापैकी प्रत्यक्षात 87 शेतकऱ्यांनी त्यांच्या 68.05 हेक्टर सलग जमिनीच्या क्षेत्रावर , फळपिकांची लागवड करण्याच्या उद्देशाने 58 हजार 627 खड्डे खोदून तितक्याच फळझाडांच्या रोपांची लागवड केली.

आंब्याची कलमे बाय मीटर अंतरावर हेक्टरी 400 झाडे लावण्यासाठी मजुरी ,

व इतर सामुग्रीसाठी मिळून एकूण 2 लाख 33 हजार 973 रुपये अनुदान तीन वर्षामध्ये टप्याटप्याने प्राप्त होत असते.

Leave a Comment

error: Content is protected !!