मुंबई : अंगणवाडी सेविकांना मिळणार शिक्षकाचा दर्जा अंगणवाडी ताईंना वेतनासह पूर्व प्राथमिक शिक्षकाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव आपण मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवू आणि त्यासाठी पाठपुरावा करू असं आश्वासन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 28 नोव्हेंबर 2023 या दिवशी मंत्रालयात आमदार कपिल पाटील साहेब यांना दिले आहे.
अंगणवाडी सेविकांना मिळणार शिक्षकाचा दर्जा
आमदार कपिल पाटील यांच्यासोबत अंगणवाडी सेविका आणि शिक्षक भारती यांची शिष्टमंडळासोबत अदिती तटकरे मॅम यांची बैठक झाली.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंडहे हि उपस्थित होते व पूर्व प्राथमिक (अंगणवाडी) शिक्षक भारतीच्या नेत्या मायाताई म्हस्के, सुरेखा घाडगे, आशाताई देशमुख, प्राथमिक शिक्षक भारती राज्य उपाध्यक्ष विनोद कडव, संघटक प्रकल्प पाटील आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
तसेच मंत्रालयात झालेल्या बैठकीला महिला व बाल विकास विभागाचे सचिव आणि आयुक्त उपस्थित होते.
बैठकीत अदिती तटकरे यांनी 3 हजार मिनी अंगणवाडी यांचं रूपांतर मोठ्या अंगणवाडीत करण्याचे व सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अंगणवाडी ताईंना सुद्धा वैद्यकीय उपचार देण्याचे आदेश दिले,
हेल्थ इन्शुरन्सचा खर्च शासन करण्याचे, थकीत बिलं तातडीने देण्याचे मान्य केले, अंगणवाडी ताई यांना दर्जेदार मोबाईल देण्याचे व पोषण आहारामध्ये दर्जा वाढवण्याचे मान्य केले.