अवकाळी पावसामुळे नुकसान झाले, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे,
तसेच राज्यातील काही भागात गारपीट सुद्धा झाली त्यामुळे शेती पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे,
खरीप हंगामामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला होता .
व अशा शेतकऱ्यांना एक प्रकारची आर्थिक मदत मिळवण्याची आशा आहे व त्यासाठी शेतकऱ्यांनी पिक वीमा अर्ज पीक विमा कंपनीकडे करणे, गरजेचे आहे.
अवकाळी पावसामुळे उभी असलेली पिके पूर्णतः वाया जाण्याच्या मार्गावर पोहोचलेली आहे तसेच राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस तसेच तुरीची लागवड केली जाते .
तर काही भागांमध्ये ज्वारी अशा विविध प्रकारच्या पिकांचा समावेश आहे.
अवकाळी पावसामुळे पिके संपूर्णतः भुईसपाट झालेली आहे, अशा स्थितीत शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत क्लेम करणे गरजेचे आहे.
पाऊस आल्याने शेती पिकाचे नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे अर्ज करणे आवश्यक आहे .
असे केल्यानंतर शेतकऱ्यांना थोड्या प्रमाणात भरपाईची रक्कम सुद्धा मिळू शकते.
अवकाळी पावसामुळे नुकसान झाले,
शेती पिकाचा अशा पद्धतीने क्लेम करा
शेतकऱ्यांना सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये crop insurance app डाऊनलोड करावा लागेल .
ॲप डाऊनलोड केल्यानंतर ओपन करून, कंटिन्यू विदाऊट लोगिन या ऑप्शन वर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर क्रॉप लॉस हे ऑप्शन दाखवण्यात येईल .त्यावर क्लिक करून, मोबाईल क्रमांक टाका तसेच खालील दिलेल्या बॉक्समध्ये शेतकऱ्यांना पिक विमा काढल्यानंतर ती पावती देण्यात येते त्यावरील नंबर टाका.
तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी संबंधित बॉक्स मध्ये टाकून सबमिट करा.
त्यानंतर शेतकऱ्यांचे पिक विमा भरण्याची संपूर्ण डिटेल्स ओपन होईल शेतकऱ्यांनी किती क्षेत्राचा पिक विमा कोणत्या पिकासाठी काढलेला आहे .
हे संपूर्ण ओपन होईल व त्यापैकी शेतकऱ्याला ज्या पिकाचा अर्ज करायचा असेल त्यावर क्लिक करावे.
त्यानंतर पुढील पेज ओपन होईल व शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान कशामुळे झालेले आहे, त्यामध्ये दहा-बारा ऑप्शन दाखवण्यात येईल त्यामध्ये तुमचे जर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले असेल,
तर अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे झाले असेल तर गारपीट हे ऑप्शन निवडा.
नुकसान होताना शेतकऱ्यांचे पीक कोणत्या अवस्थेमध्ये होते हे ऑप्शन सुद्धा निवडा,नुकसान किती टक्के झालेले आहे हे टाकून संबंधित पिकाचा व त्यासोबत शेतकऱ्याचा फोटो अपलोड करा . व सबमिट बटन वर क्लिक करून डॉकेट आयडी दाखवण्यात येईल.
त्यानंतर शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवला जाईल, व तो आयडी शेतकऱ्यांनी सांभाळून ठेवायचा आहे.
शेतकऱ्याकडे आलेला डॉकेट आयडीवरून शेतकरी आपल्या कलेमची स्थिती कुठपर्यंत आहे हे सुद्धा चेक करू शकतात .
त्यामुळे डॉकेट आयडी सांभाळून ठेवणे गरजेचे आहे अशाप्रकारे शेतकऱ्याचा क्लेम अथवा अर्ज पूर्ण होईल.