
अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करवे अशी मागणी शासनाकडे प्राप्त झाली आहे.
राज्यातील अवकाळी पाऊस पडलेल्या तालुक्यातील आजपर्यंत प्राप्त प्राथमिक अंदाजे माहितीनुसार ९९ हजार ३८१ हेक्टर बाधित क्षेत्रातील पंचनामे प्रचलित कार्यपद्धती ,
प्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत व ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था करावी,
असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान :
राज्यातील काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळपिकांच्या बाधित क्षेत्राबाबत आज रोजी कृषी विभागाकडून प्राप्त प्राथमिक अंदाजे माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या तालुक्यांमध्ये खूप नुकसान झाले आहे .
हे तालुके बाधित असून यातील ५३ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे,
पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई व डहाणू तालुक्यातील ४१ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे, नाशिक जिल्ह्यातील कळवण, नांदगाव, नाशिक, निफाड, त्र्यंबकेश्वर, सटाणा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर, चांदवड, येवला तालुक्यातील जवळ जवळ ३२ हजार ८३३ हेक्टर क्षेत्रातील कांदा
, द्राक्ष, सोयाबीन, मका, गहू, ऊस व फळपिके, धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर,
शिंदखेडा तालुक्यातील ४६ हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई, कापूस, हरभरा, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्राणी तालुक्यातील जवळपास २ हजार २३९ हेक्टर क्षेत्रातील भात, कापूस, तूर, मिरची, मका, कांदा पिकांचे, जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ
, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, धरणगाव, बोदवड, भडगाव तालुक्यातील ५५२ हेक्टर क्षेत्रातील कांदा, हरभरा, गहू, मका, ज्वारी व फळपिकांचे नुकसान झाले.
26 नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील 16 जिल्ह्यात 99 हजार 381 हेक्टरवर शेती पिकाचे नुकसान झाले आहे.
नुकसान ग्रस्त जिल्हे
- ठाणे
- पालघर
- नाशिक
- धुळे,
- नंदुरबार
- जळगाव
- अहमदनगर
- पुणे,
- सातारा,
- छ. संभाजीनगर
- जालना,
- बीड,
- परभणी,
- हिंगोली
- नांदेड
- बुलढाणा
अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिके म्हणजेच कापूस, तुर, फळपिके आणि भाजीपाला या पिकाचे नुकसान झालेले आढळून येत आहे.
या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीसोबतच अन्नधान्याच्या उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे.
कल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नुकसानाची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
पंचनामे झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठे नुकसान झाले आहे.
या नुकसानीचे मोजमाप करून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार आवश्यक पावले उचलेल.