Maratha Reservation : मराठा आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांची याचिका; 8 तारखेला सुनावणी

Maratha Reservation : मुंबईः राज्यामध्ये बीड आणि परिसरात मराठा आंदोलनाने उग्र रुप धारण केलं होतं. अनेक ठिकाणी एसटी बसेस बंद आहेत तर

काही ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडण्याचे आणि जाळण्याचे प्रकार घडलेले आहेत. याच अनुषंगाने आता Adv.

Maratha reservation : गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केलेली आहे.गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईच्या हायकोर्टात याचिका

दाखल केली आहे आणि याचिकेवर 8 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणारच आहे. एकीकडे मराठा आंदोलक आक्रमक असताना

आणि खुद्द सदावर्ते यांच्या चारचाकी गाड्या फोडलेल्या असतानाही त्यांनी याबाबत याचिका दाखल केलीय.मराठा

आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे 25 ऑक्टोबरपासून उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणनंतर राज्यात हिंसाचाराच्या

घटना घडत आहे हे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सदावर्ते यांनी याचिका दाखल केली आहे. मराठा आंदोलनकर्त्यांच्या

विरोधात कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत दाखल करण्यात आली आहेयाच्या दरम्यान, मराठा आरक्षणाच्या

विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी याआधीही याचिका केली होती. त्यांच्या याचिकेमुळे मराठा आरक्षण कोर्टात रद्द ठरवण्यात आलं

होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी मराठा आंदोलनाच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे. तसेच मनोज जरांगे यांच्या

भेटीसाठी आंतरवाली सराटी येथे सरकारचं शिष्टमंडळ पोहोचतच आहे.

आता पर्यंतच्या सर्वात शक्तिशाली Realme फोनच्या फीचर्सचा खुलासा; GT 5 Pro मध्ये मिळू शकतात तीन कॅमेरेRealme GT 5 Pro च्या लीक स्पेसिफिकेशन्सनुसार

हेही वाचा : “गड्यांनो आता तुम्ही मला माफ करा, आता मी…”; क्षीण आवाजात मनोज जरांगे यांचं मनोगत व्यक्त करत म्हणाले..मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण केलं आहे . उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे यांनी पाणी आणि उपचार घेण्याची विनंतीवर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे .मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण चालू केलं आहे. सरकारला आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी ४० दिवसांचा कालावधी देऊनही निर्णय न झाल्याने मनोज जरांगेंनी हा निर्णय घेतला. आज (२९ ऑक्टोबर) उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी पाणी आणि उपचार घेण्याच्या विनंतीवर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!