Realme GT 5 Pro :स्मार्टफोनमध्ये १६ जीबी रॅम, १टीबी स्टोरेज, ६.७८ इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो.
कंपनीनं स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी टीज केला होता.Realme लवकरच आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिजचा विस्तार करू
शकते. कंपनीचा Realme GT 5 Pro ची माहिती अधूनमधून ऑनलाइन लीक होत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार
हा फोन क्वॉलकॉमच्या नव्या कोऱ्या Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह बाजारात येऊ शकतो. ह्यात ट्रिपल रियर कॅमेरा
सेटअप सुद्धा दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये १६ जीबी रॅम आणि १ टीबी पर्यंत स्टोरेज सुद्धा मिळू शकते.
सर्टिफिकेशन वेबसाइटवर लिस्ट
अलीकडेच कंपनीनं GT 5 Pro चा टीजर शेयर केलेला होता. विशेष म्हणजे हा फोन काही दिवसांपूर्वी TENAA
वेबसाइटवर मॉडेल नंबर RMX3888 सोबत दिसला आहे. त्यानुसार ह्यात ६.७८ इंच (१,२६४x२,७८० पिक्सल) AMOLED
डिस्प्लेसह आहे. फोन ८जीबी, १२जीबी आणि १६जीबी रॅम ऑप्शन आणि १२८जीबी, २५६जीबी, ५१२जीबी आणि १जीबी
स्टोरेजबरोबर बाजारात येऊ शकतो. सोबत ऑक्टाकोर चिपसेट आणि ३.३ गिगाहर्टझ क्लॉक स्पीडसह दिसला आहे. या
लिस्टिंगमध्ये Realme GT 5 Pro चे फोटोज सुद्धा आहेत.फोटोजप्रमाणे ह्यात कर्व्ड डिस्प्लेबरोबर सेल्फी
कॅमेऱ्यासाठी होल-पंच कटआउट असणार आहे. मागे LED फ्लॅशसह सर्कुलर कॅमेरा मॉड्यूल आहे. ह्याची डिजाइन Huawei
Mate 50 सीरीज सारखी सेम दिसत आहे. फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सुद्धा फोटोमध्ये दिसला आहे. ज्यात ५०
मेगापिक्सलचे दोन सेन्सर आणि ८ मेगापिक्सलचा एक सेन्सर मिळू शकतो. या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ
कॉलसाठी फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. ह्यात ग्रॅव्हिटी सेन्सर, डिस्टन्स सेन्सर आणि लाइट सेन्सर सुद्धा देण्यात आले
आहेत. तसेच सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर मिळू शकतो.Realme GT 5 Pro मध्ये Realme GT 5 पेक्षा जास्त
अपग्रेड पाहायला मिळू शकतात. आताच Realme GT 5 चीनमध्ये 12GB RAM आणि 256 GB स्टोरेजबरोबर लाँच
झाला होता, ज्याची किंमत २,९९९ चायनीज युआन (जवळपास ३४,४०४ रुपये) एवढी होती.