अरबी समुद्रात पुन्हा झाली चक्रीय स्थिती; राज्यात पुन्हा पावसाची शक्यता

 Arbi sea :पुण्यासोबत महाराष्ट्रात १४ ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून हवामान बदलण्यास सुरुवात होईल. शहर आणि परिसरात ढगाळ

वातावरण राहील.नागपूर : मान्सूनच्या परतीचा अंतिम टप्पा सुरू असताना अरबी समुद्रात पुन्हा एकदा चक्रीय स्थिती तयार

होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सामान्यपेक्षा अधिक पाऊस

पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हा पाऊस

‘ऑक्टोबर हीट’ पासून नागरिकांची सुटका करणार का, हे मात्र निश्चित सांगता नाही.१३ ते १४ ऑक्टोबरदरम्यान अरबी समुद्रात

चक्रीय स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून त्याचा प्रभाव हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान इत्यादी राज्यांवर होण्याची

शक्यता आहे. Arbi sea :तसेच महाराष्ट्रावर सुद्धा त्याचा परिणाम होण्याची शक्यता असून काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात

आलेली आहे. पुण्यासोबत महाराष्ट्रात १४ ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून हवामान बदलण्यास सुरुवात होईल. शहर

आणि परिसरात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर १५ आणि १६ ऑक्टोबरला शहरात हलका ते मुसळधार पाऊस पडेल अशी

अपेक्षा दिसून येत आहे. त्यानुसार राज्यातील इतर भागातही

पावसाची शक्यता आहे.येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात थंड वारे वाहण्याची सुद्धा शक्यता आहे. यामुळे सुद्धा राज्यात तापमानात

घट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. बिहार, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या

काही भागात पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडू शकतो अशी अपेक्षा आहे. कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये हलका

पाऊस पडू शकतो, अशी शक्यता सुद्धा हवामान खात्याने वर्तवलेली आहे.

पीक विम्याचा मार्ग मोकळा, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळणार २५% अग्रिम

Leave a Comment

error: Content is protected !!