Whatsapp Secret Codes फिचर आलं समोर; सोपं होईल ‘हे’ काम, असा करावालागेल त्याचा वापर

Whatsapp Secret Codes Feature चा वापर करून लॉक्ड चॅट अ‍ॅक्सेस करणं सोपं होणार आहे.

लॉक केलेले चॅट्स शोधण्यासाठी नवीन पद्धत आलेली आहे.

सध्या काही वापर कर्त्यांसाठी  उपलब्ध झालेलं हे नवीन फिचर जाणून घ्या

काही महिन्या आधि WhatsApp नं Chat Lock फीचर सादर केलं होतं , त्यामुळे वापर करते आपले चॅट लॉक करण्यासाठी

बायोमेट्रिकचा सुद्धा वापर करत आहेत. हे लॉक्ड चॅटिंग मुख्य चॅट लिस्टमध्ये दिसू शकत नाहीत आणि अ‍ॅक्सेस करण्यासाठी

चॅटिंगच्या टॉपला येऊन स्वाइप करावं लागत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप आता लॉक्ड चॅटचा अ‍ॅक्सेस सोपा करण्यासाठी एक नवीन वैशिष्ट्य लाँच करत आहे, ज्याला सिक्रेट कोड फीचर अस

नाव देण्यात आलं आहे.

सिक्रेट कोड फीचर आता सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या अँड्रॉइड बीटा युजर्स साठी रोलआउट केलं जात आहे.

खाद्य तेलाच्या दरात मोठी घसरण जाणून घ्या नवीन दर

व्हॉट्सअ‍ॅप सिक्रेट कोड फिचर म्हणजे काय?

Whatsapp Secret Codes Feature: आता पर्यंत लॉक केलेलं व्हॉट्सअ‍ॅप चॅट मुख्य चॅटमध्ये दिसू शकत नव्हते. चॅट लिस्टच्या टॉपला जाऊन खालच्या बाजूला स्वाइप

केल्यावर लॉक्ड चॅट ऑप्शन दिसनार आहे.

त्यानंतर लॉक्ड चॅट उघडण्या साठी बायोमेट्रिकचा वापर करावा लागत आहे.

तसेच प्रायव्हसीमुळे लॉक केलेलं चॅट व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्चमध्ये दिसू शकत नाही. त्या मुळे जर तुमच्याकडे लॉक केलेले अनेक चॅट

असतील तर स्पेसिफिक चॅट शोधणं कठीण होत असत.

व्हॉट्सअ‍ॅपचं नवीन सिक्रेट कोड फीचर त्यासाठीच दिलेले आहे.

लेटेस्ट अपडेटनंतर, वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर कोणतंही चॅट लॉक करताना एक सिक्रेट कोड सेट करण्याचा ऑप्शन मिळणार

आहे. हा सिक्रेट कोड व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्च बारमध्ये टाकता येणार आहे, त्यामुळे लॉक केलेल्या चॅटचं नाव समोर येणार आहे.

परंतु अजूनही ते चॅट अनलॉक करण्यासाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन आवश्यक असणार आहे.

युजर सिक्रेट कोड म्हणून एक शब्द सेट करू शकतात किंवा इमोजी सुद्धा तिथे वापरू शकतात.

त्यामुळे लक्षात राहील असाच सिक्रेट कोड बनवावा लागेल. तसेच सिक्रेट कोड देऊन सुद्धा पूर्वीप्रमाणे चॅट लिस्टच्या टॉपला जाऊन

स्वाइप डाउन केल्यावर लॉक्ड चॅट दिसणार आहेतच.

सिक्रेट कोड फीचर आता सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या लेटेस्ट बीटा व्हर्जनवर टेस्ट केलं जात आहे.

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार हा व्हर्जन नंबर २.१३.२१.९ आहे. हे फीचर जुन्या बीटा व्हर्जनमध्ये दिसलं होतं आणि लेटेस्ट

अपडेटसह काही युजर्ससाठी देखील हे फिचर उपलब्ध झालं आहे.

Jalna News: मनोज जरांगेंच्या सभेसाठी मराठा समाज एकवटलेला आहे, १२३ गावांमधून लोकवर्गणी; अंतरवाली सराटी मध्ये तयारीला वेग

Leave a Comment

error: Content is protected !!