स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी कंपनीच देणार आहे बिनव्याजी कर्ज; Xiaomi नं आणलेली आहे भन्नाट स्कीम

Xiaomi Easy Finance: शाओमी इजी फायनान्स सर्व्हिस अंतर्गत कंपनी ग्राहकांना स्वस्तातले मोबाइल खरेदी करण्यासाठी सुद्धा कर्ज देणार आहे. हे कर्ज सुलभ हप्त्यांवर फेडता येईल.

Xiaomi नं अनेक वर्ष भारतीय स्मार्टफोन बाजारावर राज्य केलेलं आहे.

लो बजेट सेग्मेंटमध्ये जास्त चांगली पकड असल्यामुळे कंपनी अनेक वर्ष भारतात एक नंबरवर आलेली होती.

सध्या ह्या चिनी कंपनीची थोडी पीछेहाट झाल्यासारखं वाटत आहे, परंतु त्यातून मार्ग काढण्यासाठी कंपनीनं Xiaomi Easy Finance

म्हणजे XEF सर्व्हिस सादर केली आहे. ह्या नवीन सर्व्हिसच्या माध्यमातून लोकांना मोफत Digital Loan दिलं जाणार आहे.

Baramati soyabean: बारामतीत सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर

Xiaomi Easy Finance म्हणजे काय?

Xiaomi Easy Finance म्हणजे XEF शाओमी इंडियानं सादर केलेला डिजिटल लोन प्रोग्राम आहे.

ह्या स्कीम अंतगर्त लोकांना कागदी कारवाई न करता कर्ज दिलं जाणार आहे ज्याचा वापर ते नवीन Xiaomi Redmi smartphones

खरेदी करन्यासाठी करू शकतील. यासाठी Xiaomi India नं Axio आणि Trustonic सोबत पार्टनरशिप

सुद्धा केली आहे. स्कीम अंतगर्त कंपनी १५,००० रुपयांपर्यंतचे मोबाइल फोन देखील ईएमआयवर विकेल.

बऱ्याचदा महागड्या फोनसाठी ईएमआय स्कीम उपलब्ध असते परंतु बजेटमध्ये फोन्ससाठी हा पर्याय खूप कमी वेळा उपलब्ध

असतो. परंतु असे लोक देखल आहेत ज्यांना बजेटमधील फोन्स हवे असतात परंतु कॅश पेमेंट करून नवीन स्मार्टफोन खरेदी करू

शकत नाहीत, त्यांच्यासाठी हा शाओमी इजी फायनान्स स्कीम उपयुक्त ठरू शकते.

समजा तुम्हाला कंपनीचा Redmi 12 5G फोन विकत घ्यायचा आहे ज्याची किंमत १५,४९९ रुपये एवढी आहे.

परंतु तुमच्या बजेटनुसार इतके पैसे एकाच वेळी खर्च करणं शक्य नसेल तर, अशावेळी Xiaomi Easy Finance तुमची मदत करणार आहे.

XEF डिजिटल लोन प्रोग्राम अंतगर्त कंपनी तुम्हाला तेवढ्या रकमेची आर्थिक मदत सुद्धा करेल जिचा वापर करून तुम्ही नवीन रेडमी

स्मार्टफोन खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा खिसा खाली करण्याची गरज नाही तसेच बजेटवर अतिरिक्त भार सुद्धा पडणार नाही.

Xiaomi Easy Finance (XEF scheme) चा लाभ तुम्ही Mi Homes, Mi Studios, Mi Stores किंवा Mi Preferred Partners

सह जवळच्या रिटेल स्टोर्सवर अधिकृत शाओमी आउटलेट्सवर जाऊन सुद्धा घेऊ शकता.

आवश्यक डॉक्यूमेंट्स

शाओमीद्वारे मिळणारं मोफत डिजिटल लोन मिळवण्यासाठी ग्राहकाची KYC असण्याची  गरज आहे.

ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड, मोबाइल नंबर तसेच पॅन कार्ड गरजेचे असणार आहे. XEF scheme चं लोन अ‍ॅप्लीकेशन मोबाइलवरून भारत येईल तसेच ग्राहकांना त्वरित कर्ज सुद्धा मिळेल.

यापेक्षा स्वस्तात पुन्हा मिळू शकत नाही iPhone 13; जाणून घ्या Amazon ग्रेट इंडियन सेलमधील ऑफर.

Leave a Comment

error: Content is protected !!