Vivo च्या जबरदस्त 5G Phone वर मिळवा ३००० रुपयांचा डिस्काउंट; पहिल्याच सेलमध्ये आहे शानदार ऑफर

Vivo T2 Pro 5G काही दिवसांपूर्वी भारतात लाँच करण्यात आलेला आहे.

हा फोन आज पहिल्यांदाच सेलसाठी उपलब्ध होईल. जर तुम्ही हा विकत घेण्याचा विचार करत असला तर इथे पाहा किंमत.

Vivo T2 Pro 5G ची विक्री आज संध्यकाळी ७ वाजता आयोजित केली जाणार आहे.

हा फोन सेलमध्ये अनेक ऑफर्ससोबत कमी किंमतीत विकत घेता येणार आहे.

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल

तर आणि Vivo T2 Pro 5G च्या प्रतीक्षेत असाल तर चला पाहूया ह्या

फोनची किंमत, वैशिष्ट्य आणि ऑफर्स.

Vivo T2 Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स जाणून घ्या

ह्या फोनचा ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट २६,९९९ रुपयांच्या ऐवजी २३,९९९ रुपयांमध्ये विकत घेता येणार आहे.

फोनचा ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज आणि व्हेरिएंट २७,९९९ रुपयांच्या ऐवजी २४,९९९ रुपयांमध्ये सुद्धा विकत घेता येईल.

कारण याच्यावर ३,००० रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट सुद्धा उपलब्ध झालेला आहे.

हा फोन संध्यकाळी ७ वाजल्यापासून Vivo India च्या ई-स्टोर किंवा फ्लिपकार्टसोबत काही निवडक रिटेल स्टोर्स वरून सुद्धा खरेदी करता येईल.

ऑफर्स पाहता ICICI आणि Kotak बँकेच्या कार्ड्सचा वापर केल्यावर १० टक्के इन्स्टंट डिस्काउंट दिला जाणार आहे.

नो कॉस्ट ईएमआय अंतगर्त ८,००० रुपये दरमहा देऊन सुद्धा हा फोन विकत घेता येईल.

एक्सचेंज ऑफर किती असेल ह्याची माहिती देण्यात आली नाही.

आय कोचसह Amazfit Cheetah स्मार्टवॉच झाली लाँच; सिंगल चार्जमध्ये १२ दिवसांची बॅटरी, माहिती करून घ्या किंमत

Vivo चे फीचर्स

ह्यात ६.७८ इंचाचा फुल एचडी प्लस अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आलेला आहे ज्याचे पिक्सल रेजोल्यूशन २४०० x १०८० आहे.

ह्याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ आणि पीक ब्राइटनेस १३०० निट्झ आहे.

हा फोन ४ नॅनोमीटर फॅब्रिकेशनवरील मीडियाटेक डायमेन्सिटी ७२०० प्रोसेसर सोबत आला आहे.

सोबत ८ जीबी रॅमसह २५६ जीबी एवढे सुद्धा स्टोरेज देण्यात आले आहे.

या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप सुद्धा आहे ज्याचा पहिला सेन्सर ६४ मेगापिक्सलचा आहे.

दुसरा २ मेगापिक्सलचा बोकेह सेन्सर सुद्धा आहे. त्याचबरोबर १६ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर सुद्धा देण्यात आला आहे.

फोनमध्ये ४६०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी ६६वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Weather of October 2023:ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हवामान कसे असेल, आयएमडीने सांगितले; तुमच्या शहराची स्थिती जाणून घ्या

Leave a Comment

error: Content is protected !!