Redmi Note 12 च्या किंमतीत झाली मोठी कपात; आता बजेटमध्ये बसणार ६जीबी रॅम असलेला फोन
Redmi Note 12 4G: रेडमी नोट १२ ४जी च्या दोन्ही मॉडेल्सच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.
हा फोन ६जीबी रॅम, ५०
एमपी कॅमेरा आणि ५०००एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.
Redmi नं यंदा भारतात Redmi Note 12 स्मार्टफोन लाँच केला होता जो ५० मेगापिक्सलचा कॅमेरा, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६८५
प्रोसेसर आणि ५जीबी वर्चुअल रॅम सारख्या स्पेसिफिकेशन्ससह आला आहे.
आता कंपनीनं भारतीय ग्राहकांना एक भेट दिलेली आहे आणि ह्या मोबाइलच्या किंमतीत थेट २,००० रुपयांची कपात केली आहे.
विशेष म्हणजे नव्या किंमतीसोबत रेडमी नोट १२ ची विक्री सुद्धा सुरु झाली आहे.
Redmi Note 12 ची नवीन किंमत
रेडमी नोट १२ भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध आहे.
या स्मार्टफोनमध्ये ६जीबी रॅम देण्यात आलेल्या आहे आणि सोबत ६४जीबी व १२८जीबी स्टोरेज सुद्धा मिळते.
ह्यातील ६४ जीबी स्टोरेज मॉडेल १४,९९९ रुपयांच्या ऐवजी आता १२,९९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल.
तर १२८जीबी स्टोरेज मॉडेल १६,९९९ रुपयांमध्ये विकला जात होता जो आता १४,९९९ मध्ये उपलब्ध झाला आहे.
हा रेडमी मोबाइल कंपनीच्या वेबसाइटसह शॉपिंग साइट्स व रिटेल स्टोर्सवर नव्या किंमतीसह उपलब्ध झाला आहे.
Sunrise Gold, Lunar Black आणि Ice Blue कलरमध्ये विकत घेता येईल.
Maratha Reservation: त्यांनी आधी सरकारला झुकवलं, आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभरात फिरुन हवा तापवणार
Redmi Note 12 चे स्पेसिफिकेशन्स
रेडमी नोट १२ मध्ये ६.६७ इंचाचा मोठा पंच-होल डिस्प्ले देण्यात आलेला आहे.
हा सुपर अॅमोलेड पॅनलवर बनलेला आहे तसेच १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट, १२००निट्झ ब्राइटनेस आणि ३९४पीपीआय ला सपोर्ट करत आहे.
पावर बॅकअपसाठी ह्या फोनमध्ये ५,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी ३३वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.
Redmi अँड्रॉइड १३ आधारित मीयुआय १४ वर सादर करण्यात आला आहे.
हा रेडमी फोन २ वर्ष अँड्रॉइड अपडेट आणि ४ वर्ष
सिक्योरिटी अपडेट देईल. ह्यात क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगन ६८५ ऑक्टाकोर प्रोसेसर आहे.
सोबत ६जीबी रॅम आणि १२८जीबी पर्यंत स्टोरेज मिळते. ५जीबी वर्चुअल रॅममुळे एकूण ११ जीबी रॅमची पावर देखील मिळवता येते.
फोटोग्राफीसाठी ह्याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे.
तसेच फ्रंटला १३ मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर देण्यात आला आहे. Redmi ड्युअल सिम फोन आहे जो ४जी एलटीईला सपोर्ट करतो. ह्या फोनमध्ये ३.५एमएम जॅक आणि ओटीजी सारखे वैशिष्ट्य सुद्धा मिळतात.