Maratha Reservation: त्यांनी आधी सरकारला झुकवलं, आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभरात फिरुन हवा तापवणार

Jalna News: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे-पाटील पुन्हा आक्रमक होणार का? मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं,तुम्ही त्यांना पुरावे कुठं मागतायत, जरांगेंचा थेट प्रश्न.

हायलाइट्स:
     १४ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी मेळावा घेणार
     त्यांच्याकडे असे कोणतेही हत्यार व शक्ती नाही की त्याचा वापर करून ते मला फोडू शकणार आहेत
      जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत त्यांचा डाव चालू शकत नाही
जालना: मराठा समाजाला सरसकट म्हणजे सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळावीत,

या मागणीसाठी तब्बल १७ दिवस उपोषणाला बसून संपूर्ण राज्याचे लक्ष स्वत:कडे वेधून घेणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी एक

सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.

मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी राज्यव्यापी दौरा करायचे ठरवले आहे.

जरांगे यांच्या उपस्थितीत जालन्यात मराठा समाजाची विचार मंथन बैठक संपन्न झालेली होती.

या बैठकीत मनोज जरांगे यांनी मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन केले होते.

आरक्षणाविना मराठा समाजातील पाच पिढ्या बरबाद झालेल्या आहेत, मी आता यापुढील पिढ्या बरबाद होऊ देणार नाही.

सत्ताधारी,विरोधकांनी कितीही दडपण आणले तरी सुद्धा मी आता माघार घेणार नाही,

असा इशारा अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याचा दौरा करणार आहेत आणि त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी मेळावा सुद्धा घेणार

असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

० हजारांच्या बजेटमध्ये मिळाला आणखी एक दमदार फोन; वाय सीरिजमध्ये Vivo Y36 5G चा समावेश झाला

अंतरवाली सराटी येथे शनिवारी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मराठा समाजाची विचार मंथन बैठक घेण्यात आलेली आहे.

यावेळी ते बोलत होते. त्यांच्याकडे असे कोणतेही हत्यार व शक्ती नाही की त्याचा वापर करून ते मला फोडू शकतील.

जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत त्यांचा डाव चालू शकत नाही.

सत्ताधारी, विरोधी पक्षातील नेत्यांची शान मराठा समाजाने वाढवलेली आहे.

आता कोण नागपूरला जातेय,कोणी कोल्हापूरला जातेय,कोणी पुण्याला जाऊन उचूकन देत आहे.

कोणी कितीही उचकावले तरी मराठा समाज व ओबीसी समाज वाद घालणार नाही व आम्ही समोरासमोर सुद्धा येणार नाहीत अस

मनोज जरांगे म्हणाले . दिलेल्या मुदतीत शासनाने आरक्षणाची मागणी पूर्ण करावी, नाहीतर आमरण उपोषण पुन्हा चालू केले जाणार

आहे,असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिलेला आहे.

राज्यातील समाज बांधवांनी शांततेत आंदोलन करावे, कोठेही उद्रेक करू नये, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले.
मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं,तुम्ही त्यांना पुरावे कुठं मागतायत असेही ते म्हणाले.आमच्याकडे गाड्याच्या गाडे पुरावे असूनही

आम्हाला आरक्षण का मिळत नाही.

दोन दिवसात गुन्हे परत घेतो असे सुद्धा सांगितले होते.परंतु,अद्याप गुन्हे परत घेतलेले नाहीत असे जरांगे म्हणाले.

याच्यामुळे आता आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करावा लागणार आहे.

यासाठी राज्यव्यापी मेळावा घेतला जाणार आहे, आणि मेळाव्याला ३५ लाखावर मराठा समाज बांधव येणार आहेत अस त्यांनी

सांगितलं. मेळाव्यासाठी १० ते १२ दिवसांचा राज्यव्यापी दौरा करणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले.

साखळी उपोषणाच्या नवव्या दिवशी शनिवारी रेणापुरी गावातील नागरिकांनी सहभाग नोंदविला होता.
राज्य सरकारला जागं करण्यासाठी अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा

केलेलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हाताने फळांचा रस घेऊन उपोषण सोडल्यानंतर जरांगे यांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत सुद्धा दिलेली

आहे.

या दिवसात मराठा समाजाला आरक्षण आणि सरसकट म्हणजे सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

त्यासाठी सरकारनं एक समिती सुद्धा स्थापन केलेली आहे.

त्यासाठी सरकारला पुन्हा जागं करण्यासाठी येत्या १४ तारखेला अंतरवाली सराटीत मराठा समाजाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

या कार्यक्रमाला मनोज जरांगे पाटील संबोधित करणार आहेत आणि त्यावेळी सरकारला जाब विचारणार आहेत.

बाकी सर्व विसरा! Realme च्या ‘ह्या’ फोनसाठी बाजूला ठेवा पैसे; GT 5 Pro चा टीजर कंपनीनं केला शेयर

Leave a Comment

error: Content is protected !!