आता 10 वर्षांच्या वॉरंटीसह लाँच झाली ही स्वस्त बाईक; वैशिष्ट्यांसह आहे जबरदस्त

टू-व्हिलर खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

10 वर्षांच्या वॉरंटीसह Honda CB200X बाईक भारतीय बाजारपेठेत सुद्धा लाँच झालेली आहे.

तसेच या बाईकचे वैशिष्ट्ये देखील जबरदस्त आहे. जाणून घ्या
दुचाकी वाहन कंपनी आपल्या नव-नवीन बाईक भारतीय बाजारपेठेत सुद्धा लाँच करत आहे.

इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचा भारतीय बाजारपेठेत देखील खूप जास्त मागणी आहे.

Honda ने भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी एक नवीन बाईक लाँच केलेली आहे,

या मोटरसायकलमध्ये तुमच्यासाठी काय खास आहे आणि ही बाईक घेण्यासाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील? याबद्दल सविस्तर डिटेल्स माहिती करून घेऊ.

होंडाची Honda CB200X ही नवीन बाईक OBD2 कॉम्प्लायंट इंजिन,

स्टायलिश बॉडी ग्राफिक्स आणि नवीन असिस्ट आणि स्लिपर क्लचसह लाँच करण्यात आली आहे.
डिझाईन-
होंडाने या मोटरसायकलच्या डिझाईनमध्ये कोणताही बदल केलेला नसून नवीन रंग आणि स्टायलिश ग्राफिक्समुळे या बाइकला

अतिशय मस्त लुक दिला आहे. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर CB200X मध्ये तुम्हाला 5 लेव्हल कस्टमाइज करण्यायोग्य

ब्राइटनेस असलेले डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल सुद्धा मिळेल.

OPPO A38 भारतात झाला लाँच; कमी किंमतीत ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ५००० mah ची बॅटरी

मोटरसायकलमध्ये एलईडी लाइटिंग सिस्टिम-

इतकेच नाही तर या बाईकमध्ये स्पीडोमीटर, ओडोमीटर, फ्युएल गेज, ट्विन ट्रिप मीटर, बॅटरी व्होल्टमीटर,

गियर पोझिशन इंडिकेटर सुद्धा देण्यात आलेले आहेत. याशिवाय होंडाच्या या अत्याधुनिक मोटरसायकलमध्ये तुम्हाला एलईडी लाइटिंग सिस्टिमही पाहायला मिळेल.


इंजिन डिटेल्स-
Honda CB200X मध्ये 184.40 cc सिंगल सिलेंडर,

एअर कूल्ड मोटर आहे जी 8500rpm वर 17 bhp पॉवर आणि 6000rpm वर 15.9 Nm टॉर्क जनरेट करते.

6 स्पीड गिअरबॉक्ससह, तुम्हाला या बाइकमध्ये नवीन स्लिप आणि असिस्ट क्लच सुद्धा पाहायला मिळणार आहेत.

सस्पेन्शनसाठी सोनेरी रंगाचे अपसाइड डाउन फ्रंट फॉर्क्स आणि मागील मोनो शॉक शोषक यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

सुरक्षेचा विचार करून, कंपनीने सिंगल चॅनल एबीएससह पुढील आणि मागील बाजूस पेटल डिस्क ब्रेक सुद्धा दिलेले आहेत.
वॉरंटी तपशील-
होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया या बाईकवर 3 वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी देत आहे,

त्यासोबत 7 वर्षांची ऐच्छिक वॉरंटीही मिळू शकणार आहे.


बाईकची किंमत किती आहे?-
या बाईकची किंमत 1 लाख 46 हजार 999 रुपये (एक्स-शोरूम) एवढी ठेवण्यात आलेली आहे,

तुम्ही ही बाईक डिसेंट ब्लू मेटॅलिक (नवीन), पर्ल नाईटस्टार आणि स्पोर्ट्स रेड कलरमध्ये खरेदी करू शकणार आहेत.

1.5 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्हाला Yamaha FZ-S FI आणि Bajaj Avenger 160 Street यासह इतर अनेक चांगले मॉडेल्स मिळतील.

या दोन्ही मॉडेल्सची किंमत अनुक्रमे 1,21,400 रुपये (एक्स-शोरूम) आणि 1,16,832 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होणार आहे.

Redmi नं भारतात लाँच केलेला आहे Smart Fire TV 4K; जाणून घ्या किंमत.

Leave a Comment

error: Content is protected !!