How to plant Bamboo : मोठ्या प्रमाणात उत्पन्नासाठी किवा बदलत्या हवामानाच्या स्थितीत तग धरू शकणारे पीकाचे उत्पादन म्हणून बांबू शेतीकडे पाहिले जाऊ लागतात.
नुकतीच शासनानेही बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना रोपांपासून लागवडीपर्यंत टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
पुढील काळात वाढत जाणारी इथेनॉलची मागणी आणि वेगवेगळ्या उद्योगांसाठी बांबूची गरज भासते.
मागणी वाढत चालली आहे. शेतकऱ्याने बांबूची लागवड कशी करावी? कोणत्या जमिनीत बांबूचे पीक चांगले येते? उत्पन्नाचा चांगला स्त्रोत म्हणून बांबू शेतीकडे पाहता येऊ शकते का? जाणून घेऊया.
बांबू लागवडीसाठी आवश्यक जमीन व हवामान
– ज्या भागातील सरासरी वार्षिक तापमान ८.८°c ते ३६ अंश सेल्सिअस मध्ये असते,
किंवा ज्या भागात बाराशे ७० ते ४५० मिलिमीटर पावसाची आवश्यकता असते अशा वातावरणात बांबूचे उत्पादन घेता येऊ शकते.
– अधिक उताराच्या जमिनीमध्ये बांबूचे उत्पादन घटू शकते. त्यामुळे सपाट व कमी उताराची जमीन बांबू उत्पादनासाठी योग्य ठरते.
बांबू ची लागवड साधारणतः नदीकाठि असलेल्या रानात
खडकाळ भागा पासून बनलेल्या बाळूकामुळे चिकन ते चिकन पोयटा प्रकारची जमीन या पिका साठि योग्य मानली जाते.
– अलीकडे बांबूचा समावेश गवत वर्ग पीक लागवडीत केल्यामुळे बांबूची लागवड आता शेतात किंवा बांधावरही करता येऊ शकते.
बांबूच्या कोणत्या जाती आहेत?
महाराष्ट्रात बांबूच्या १२१ जाती असून त्यापैकी कळक, काटेरी, मानगा, चिवा, चिवारी, मोठा बांबू, पिवळा बांबू इत्यादी जाती कोकणात आढळून येतात.
बांबू पिकच्या व्यवसायासाठी कळक, मानवेल, माणगा व मेस या बांबूच्या महत्त्वाच्या व्हारायतिला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
बांबू लागवडीचा फायदा काय? How to plant Bamboo?
१) पर्यावरण आर्थिक उन्नती आणि रोजगाराच्या भरपूर संधी बांबू उत्पादनातून शेतकऱ्यांना मिळत आहेत.
नवीन पद्धतीनेही बांबू पिकाची लागवड आपण करू शकतो.
बांबूची लागवडीत जास्त उत्पादन हवे असेल तर त्या साठि योग्य पद्धत ठिबक सिंचन असेल.
२) अद्रक, हळद, भाजीपाला हे पीक आपण अंतर पीक म्हणून आपण बांबूच्या फिकट घेऊ शकतो.
३) घर, छप्पर, चटई, टेबल, ई. अनेक वस्तू आपण बांबू पासून आपण बनवू शकतो.
बांबूपासून केल्या जाणाऱ्या उद्योगांना शासनाचे अनुदानही मिळते.
केवळ बांबुचा उद्योग म्हणूनच नाही तर बांबू पासून इथेनॉल साठि आपण करू शकतो.
त्यामुळे येणाऱ्या काळात बांबूची प्रचंड मागणी वाढण्याची शक्यता आहे.
कधी करता येते लागवड?
– बांबूची लागवड पावसाळ्यात करता येते. परंतु ठिबक किवा तुषार सिंचन उपलब्ध असल्यास,
आपण नोव्हेंबर व डिसेंबर मध्येही लागवडिस पात्र ठरू शकतो.
– कमी वढणार्या जातीसाठी ३x३ मी., अतिशय महत्वाचे मध्यम व्यासाकरिता आहे.
माणगा, माणवेल इ. ५x५ मी. आणि अधिक मोठ्या व्यासाच्या बांबूसाठी ७x७ मी.
तर अंतराची शिफारस अशीअसणार हेमिलटोनीसाठी १०x१० मी करण्यात उत्तम आहे.
– बांबूची लागवड करण्यापूर्वी प्रत्येक खड्ड्यातून पाच किलो कंपोस्ट किंवा गांडूळखत,
युरिया १०० ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट १०० ग्रॅम, म्युरेट ऑफ पोटॅश ५० ग्रॅम इत्यादि सामग्री लागवड करण्यापूर्वी मिसळावे.
– कंद, रोपे, कंदकाठी खड्ड्याच्या बरोबर मध्य भागी सरळ आणि उभी ठेवून माती एका पेरापर्यंत घट्ट लावून घ्यायला हवी.
– त्यानंतर रोपाभोवती पसरवून आच्छादन करून घ्यावे. लागवड करताना रोपाच्या भोवती भोवती पाणी साठून राहू नये,
याची जास्त प्रमाणात काळजी घ्यावी लागते.
बांबू लागवड कुठे शक्य?
- पाणी साचलेल्या भागामध्ये लागवड शक्य आहे आणि शेतीसाठी अयोग्य, दुष्काळी भागात शक्य आहे.
- व्यावसायिक उत्पादणकडे बघून कठीण, लवचिक आणि टिकाऊ, उत्पादनास जास्त असल्याने फायदेशीर आहे.
- बांबूचा सुमारे १५०० प्रकारे कामकाजासाठी उपयोग. कृषी अवजारे, वेल प्रजातीचे पीक घेण्यासाठी,
- घरबांधणी, हस्तकला, पेपर निर्मिती, खेळण्या बनवण्यासाठी, खाण्यासाठी इ. कामासाठी बांबूचा उपयोग होतो.
- बांबू हा लाकडाला उत्तम पर्याय. फर्निचर, पार्टीशन निर्मितीसाठी उपयुक्त.
- व्यावसायिक दृष्टीने लागवड करण्यासाठी १७ प्रजातींची शिफारस राष्ट्रीय बांबू मिशनने भारतात केली आहे.
परसबाग, शेतीच्या बांधावर, मृद यांची नुकसान होऊ नये म्हणून बांबूची व्यावसायिक रित्या लागवड योग्य आहे.