रॉयल एनफिल्डच्या गाड्यांची तरुणांना फारच क्रेझ आहे. मुळात रॉयल एनफिल्ड ही कंपनीच जास्त लोकप्रिय आहे.
आजच्या मुलांना रॉयल एनफिल्ड बुलेट खूपच आकर्षित वाटते. कारण या बाईकचा लुक
300 cc आणि पॉवरफूल मोटरसायकलींची बंपर विक्री-
भारतात, दर महिन्याला 300 cc आणि जास्त पॉवरफूल मोटरसायकलींची बंपर विक्री होत आहे आणि रॉयल एनफिल्डच्या
मोटारसायकली या दुचाकी सेगमेंटमध्ये सर्वात जास्त विकल्या जातात.
यासह Honda, Jawa-Yezdi, Triumph, KTM आणि Bajaj सारख्या कंपन्या सुद्धा आहेत.
आम्ही तुम्हाला 300 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या टॉप 10 बाइक्सबद्दल सांगत आहोत.
भारतात सर्वात जास्त विकल्या जाणार्या 350cc मोटारसायकली: आजकाल, नवीन बाईक खरेदी करणार्यांमध्ये 300-400 cc
पर्यंतच्या मोटारसायकल खरेदीची क्रेझ सुद्धा वाढत आहे.
भारतीय बाजारपेठेत 100-200 सीसीच्या मोटारसायकली जास्त विकल्या जात असल्या तरी, छंद ही देखील एक मोठी गोष्ट आहे
आणि लोक आजकाल त्यांचा छंद पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पॉवरफूल बाइक्स खरेदी करत आहेत.
आता पॉवरफूल मोटरसायकलबद्दल बोलायचे झाल्यास,
रॉयल एनफील्ड सध्या या सेगमेंटवर राज्य करत आहे आणि क्लासिक 350 आणि बुलेट 350 सोबत, हंटर 350 खूप विकल्या
जातात. यानंतर Honda CB350, Triumph Speed 400 आणि KTM 390 सह इतर बाइक्स पण आहेत.
टॉप 10 मध्ये रॉयल एनफिल्डच्या 5 मोटारसायकल-
भारतातील 300 ते 400 cc पर्यंतच्या टॉप 10 मोटारसायकलींबद्दल बोलायचे झाले तर, Royal Enfield Classic 350 पहिल्या
क्रमांकावर आहे, जी गेल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट 2023 मध्ये 26,118 एवढ्या ग्राहकांनी खरेदी केली गेली होती.
क्लासिक 350 च्या विक्रीत 37 टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे.
यानंतर हंटर 350 चे 14,161 युनिट्स, बुलेट 350 चे 12,604 युनिट्स आणि
मेटियर 350 चे 8,626 युनिट्स सुद्धा विकले गेले आहेत.
यानंतर रॉयल एनफील्ड इलेक्ट्रा 350 सुद्धा आहे, जी लिस्टमध्ये 7 व्या क्रमांकावर आहे.
खरं तर, ज्याप्रमाणे तरुणांमध्ये आयफोन वापरणे हे स्टेटस बनले आहे, तस रॉयल एनफिल्ड कंपनीच्या बाईक्स वापरणे हे देखील
स्टेटस सिम्बॉल मानतात आणि त्यामुळेच लोक दुसऱ्या कंपनीची मोटरसायकल चालवतात, पण आनंद लुटण्यासाठी ते रॉयल एनफिल्ड मोटरसायकल चालवतात.
Redmi Note 12 च्या किंमतीत झाली मोठी कपात; आता बजेटमध्ये बसणार ६जीबी रॅम Redmi Note 12 असलेला फोन
होंडा, ट्रायम्फ, केटीएम आणि बजाज मोटरसायकल-
जर आपण रॉयल एनफिल्ड व्यतिरिक्त इतर कंपन्यांच्या 300 ते 400 cc च्या लोकप्रिय मोटरसायकलबद्दल बोलायचे झाल्यास,
Honda CB350 टॉप 10 लिस्टमध्ये ती 5 व्या क्रमांकावर आहे, जी गेल्या महिन्यात ऑगस्टमध्ये 3,457 लोकांनी खरेदी केलेली होती.
यानंतर, आताच लाँच झालेल्या ट्रायम्फ स्पीड 400 च्या 3204 युनिट्सची विक्री झाली.
जावा आणि येझदी या लिस्टमध्ये 8व्या क्रमांकावर आहेत आणि त्यांनी मिळून 2314 बाइक्स विकलेल्या आहेत.
9व्या क्रमांकावर KTM 390 होती, ज्याने 855 युनिट्सची विक्री केली आणि 10व्या क्रमांकावर बजाज डोमिनार 400 होती, ज्याने
828 युनिट्सची विक्री केली.